आपल्या व्हॅलेंटाइनला या रोमँटिक ठिकाणी फिरायला न्या अन् तिचं मन जिंका!

आपल्या व्हॅलेंटाइनला या रोमँटिक ठिकाणी फिरायला न्या अन् तिचं मन जिंका!

काही दिवसांनी व्हॅलेंटाइन आठवड्याला सुरुवात होणार आहे. या काळात अनेक जोडप्यांना क्वालिटी टाइम घालवण्यासाठी फिरण्याचे प्लॅन करत असतात. अशावेळी फिरण्यासाठी कुठे जावे? असा प्रश्न जोडप्यांना पडलेला असतो. यावेळी जगभरातील फिरण्याची अनेक ठिकाणे जाणून घेऊया…

इस्तंबूल, तुर्की
इस्तंबूल हे अनेक सेलिब्रिटींचे आवडते ठिकाण आहे. येथे केवळ हिंदुस्थानातूनच नाही तर परदेशातूनही लोक भेट देण्यासाठी येतात. जर तुम्हालाही व्हॅलेंटाईन वीक साजरा करायचा असेल तर हे ठिकाण परिपूर्ण आहे. येथे जोडपे बॉस्फोरस डिनर क्रूझ, कॅमेलिका हिल आणि पियरे लोटी हिलला भेट देऊ शकतात.

स्वीत्झर्लंड
बर्फाळ दऱ्या कोणाला आवडत नाहीत? जर तुम्हाला थंड वारा आणि सुंदर दऱ्या आवडत असतील तर स्वित्झर्लंड हे परिपूर्ण ठिकाण आहे. टिटलिस आणि जंगफ्राऊ येथे बर्फाचा आनंद घेता येतो.

पॅरिस
पॅरिस हे सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पॅरिसला लव्ह सिटी देखील म्हणतात. पॅरिसमध्ये जोडपे व्हॅलेंटाईन वीक साजरा करू शकतात. येथील आयफेल टॉवर हे सर्वात रोमँटिक ठिकाण मानले जाते. येथे सीन नदीत क्रूझ राईडचा आनंदही घेता येतो.

व्हेनिस, इटली
इटलीतील व्हेनिस शहर जगभर त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. व्हेनिस हे पाण्याच्या मध्यभागी वसलेले शहर आहे. येथे जोडप्यांना ग्रँड कॅनॉलमध्ये गोंडोला राईडचा आनंद घेता येऊ शकतो. याशिवाय, जोडपे सॅन मार्को स्क्वेअरवर एकमेकांसोबत वेळ घालवू शकतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गोविंदावर दु:खाचा डोंगर कोसळला, सावलीच हरवली, अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू गोविंदावर दु:खाचा डोंगर कोसळला, सावलीच हरवली, अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू
घटस्फोटाच्या चर्चेने अभिनेता गोविंदा चांगलाच अडचणीत आलेला आहे. सध्या मीडियात गोविंदाच्या घटस्फोटाचीच चर्चा सुरू आहे. असं असतानाच आता गोविंदावर दु;खाचा...
Kolhapur News – पन्हाळ्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आढळला साप
Santosh Deshmukh Case – अशी वेळ इतर कुणावरही येऊ नये, यात कुणाचा हात आहे त्याला शिक्षा दिली पाहिजे, वैभवी देशमुखची सरकारकडे मागणी
मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का; एकाचवेळी चार बडे नेते सोडणार उद्धव ठाकरेंची साथ
IPS अधिकाऱ्याची सावत्र मुलगी अन् अभिनेत्री सोन्याच्या तस्करीत, 13 कोटींचे सोने जप्त, बॉलीवूड स्टाईलने तस्करी
राज्यातील 58, 394 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट, अजूनही मिळाले नाही अनुदान
राज्यातील 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कोणाची कुठे झाली नियुक्ती…