38th National Games – आर्या-रुद्राक्ष जोडीचा रूपेरी वेध, स्पर्धेत पटकावले सलग दुसरे पदक

38th National Games – आर्या-रुद्राक्ष जोडीचा रूपेरी वेध, स्पर्धेत पटकावले सलग दुसरे पदक

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या आर्या बोरले व रुद्रांक्ष पाटील यांनी चमकदार कामगिरी करत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. नेमबाजी मधील 10 मीटर रायफल मिश्र दुहेरीत रौप्य पदक पटकावले आहे. यापूर्वी त्यांनी वैयक्तिक विभागातही रौप्य पदक पटकावले होते. त्यांचे या स्पर्धेतील हे सलग दुसरे रुपेरी यश आहे.

महाराणा प्रताप क्रीडा संकुलातील त्रिशूल शूटिंग रेंजवर रंगलेल्या 10 मीटर रायफल मिश्र दुहेरीच्या लढतीत आर्या-रुद्रांक्ष या जोडीने पंजाबच्या ओजस्वी ठाकूर व अर्जुन बबुटा या जोडीला कडवी झुंज दिली. मात्र, पंजाबच्या जोडीने महाराष्ट्राच्या जोडीवर 16-12 असा विजय संपादन करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. आर्या हिने याआधी या स्पर्धेतील दहा मीटर एअर रायफलमध्ये रौप्य पदक जिंकले होते. रुद्राक्ष यानेही याच क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकाविले होते.

पात्रता फेरीत चमकदार कामगिरी करीत महाराष्ट्राने अंतिम फेरीत धडक मारली होती. सुरूवातीला महाराष्ट्राने अंतिम लढतीत पंजाबविरूद्ध दमदार नेमबाजीचे प्रदर्शन घडवले. 6-2 गुणांची आघाडी घेतल्यानंतर 8 व्या फेरीत पंजाबच्या जोडीने अचूक नेमबाजी करीत 10-10 असा अचूक नेम साधत महाराष्ट्राला मागे टाकले. अखेरच्या फेरीत आर्या व रुद्रांक्ष दबावाखाली खेळल्याने त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

आर्या ही 22 वर्षीय खेळाडू सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) खेलो इंडिया शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत नवी दिल्ली येथे मनोज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ती नाशिकची असून तेथे एचपीटी महाविद्यालयात कला शाखेत ती शिकत आहे. मुंबई येथे स्नेहल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणार्‍या रुद्राक्ष याने जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवीत गतवेळी ऑलिंपिक कोटा मिळविला होता. त्याने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर भरघोस पदके जिंकली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ग्रामीण भागात एसटी रुबाबात धावणार, नव्या गाड्यांच्या समावेशाने लांबपल्ल्याचा प्रवास सुखकर होणार ग्रामीण भागात एसटी रुबाबात धावणार, नव्या गाड्यांच्या समावेशाने लांबपल्ल्याचा प्रवास सुखकर होणार
एसटी महामंडळात स्वमालकीच्या २६४० बसेस टप्प्या टप्प्याने दाखल होत आहेत. पहिल्या टप्प्यातील ११० बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस अशोक...
खुशी कपूरच्या मिस्ट्री मॅनचा खुलासा?; कोण आहे अभिनेत्रीच्या स्वप्नांचा राजकुमार?
BMC Budget 2025 : महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये घट, प्रत्येक वर्षी 4500 कोटींचा तोटा; 4 फेब्रुवारीला सादर होणार BMC चं अर्थसंकल्प
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल – नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 8 नक्षलवाद्यांचा खात्मा
फक्त पोकळ घोषणा, मोठ्या वल्गना…शेतकरी, कृषीक्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काहीही नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
Crime News – मानवतेला काळीमा, मेव्हणीवर बलात्कार करून मृतदेह जाळला
Budget 2025 – निधीमध्ये कपात केल्याने महत्त्वाच्या क्षेत्रांना फटका; पी. चिदंबरम यांनी आकडेवारीतून केले स्पष्ट