वाल्मीक कराडवर मकोका न लावल्यास सामूहिक आत्मदहन करणार, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा सरकारला इशारा
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आता मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना दिली जात नाही. तसेच खंडणी प्रकरणी आरोप असलेल्या वाल्मीक कराडला आरोपी करावं, अशी मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केली आहे. यासोबतच वाल्मीक कराड यावर मकोका न लावल्यास पर्वा सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा मस्साजोगच्या ग्रामस्थांनी राज्य सरकारला दिला आहे.
दरम्यान, याआधी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उद्या मोबाइल टॉवरवर जाऊन स्वतःला संपवून घेणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले आहेत की, ”वाल्मीक कराड या आरोपीवर मकोका आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल झाला नाही तर, उद्यापासून माझं आणि माझ्या कुटुंबीयांचं वैयक्तिक आंदोलन सुरू होईल. मी मोबाइल टॉवरवर जाऊन स्वतःला संपवून घेणार.”
ते म्हणाले आहेत की, ”या आरोपींना उद्या सोडलं तर, हे माझी हत्या करतील. मला ही अशाच निर्घृण पद्धतीने मारतील. मग माझ्या कुटुंबियांच्या न्याय मागणारं कोणीही नसेल. मी असं केल्यास, माझ्या भावलाही समाधान वाटेल की, आपला भाऊ स्वतः संपला. मात्र अशा (क्रूर) पद्धतीने मारला गेला नाही.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List