वजन कमी करण्यासाठी उकडलेल्या तांदळाचे पाणी ठरेल फायदेशीर, वजन कमी होण्यासोबतच बीपी राहील नियंत्रणात
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अनियमित जीवनशैलीमुळे लोकांमध्ये अनेक प्रकारचे आजार होत आहेत. लठ्ठपणा हे याचे सर्वात मोठे कारण ठरत असून लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब मधुमेहासह या संबंधित अनेक आजारही होतात. वजन कमी करण्यासाठी लोक विविध पद्धतींचा अवलंब करतात. परंतु काही वेळा सर्व प्रयत्न अपयशी ठरतात. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात पण वजन कमी होत नाही. कधी कधी काही लोक वजन कमी करण्यासाठी औषधांचा वापर सुद्धा करतात. त्यामुळे समस्या कमी होण्याऐवजी वाढत जातात. यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊ जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करतील. हे उपाय वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात असे तज्ञांचे मत आहे. जाणून घेऊ कोणते आहेत ते उपाय
या पाण्यात असतात मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे
आहार तज्ञ डॉक्टर परमजीत कौर सांगतात की जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तांदूळ उकडलेले पाणी फायदेशीर ठरू शकते. या पाण्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असून अनेक आजारांवर हे फायदेशीर ठरते. उकडलेल्या तांदळाच्या पाण्याचे काही फायदे जाणून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. हे पाणी पिल्याने तुम्ही पचन क्रिया चांगली राहते. तसेच बीपी ही नियंत्रणात राहतो याशिवाय लठ्ठपणा कमी होतो. या पाण्यात असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
उकडलेल्या तांदळाच्या पाण्याचा असा करा वापर
जर तुम्ही रोज उकडलेल्या तांदळाचे पाणी पिले तर तुमचे वजन हळूहळू कमी होऊ लागते. या पाण्यामध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. हे पाणी पिल्याने तुमच्या शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी सहज कमी होते. हे पाणी तयार करण्यासाठी तुम्हाला तांदळात जास्त पाणी ठेवून शिजवावे लागेल आणि तांदूळ शिजल्यावर ते गाळून घ्यावे लागेल. यानंतर तांदळाचे पाणी थंड करून प्या. वजन कमी करण्यासाठी हा सर्वात प्रभावी आणि सोपा उपाय आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List