प्रवास केल्यानंतर तुमचेही पोट होते का खराब? मग या टिप्स ठरतील फायदेशीर

प्रवास केल्यानंतर तुमचेही पोट होते का खराब? मग या टिप्स ठरतील फायदेशीर

वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायला हे सर्वांनाच आवडते. पण फिरायला जाण्यासाठी बराच वेळ प्रवास करावा लागतो. प्रवास केल्यानंतर पचनाशी संबंधित समस्या उद्भवणे ही एक सामान्य समस्या आहे. प्रवास करताना एकाच जागी बराच वेळ बसावे लागते. त्यामुळे पोटावर जास्त दाब पडतो त्यामुळे ब्लोटिंग, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी यासारख्या सामान्य समस्या उद्भवतात. याशिवाय कुठेही जाताना खाण्यापिण्याची काळजी घ्यावी लागते. प्रवासादरम्यान खाण्यापिण्याच्या सवयी योग्य नसतील तर त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात. प्रवासानंतर आतड्यांचे आरोग्य राखणे फार महत्त्वाचे आहे. याची काळजी न घेतल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्रवासादरम्यान उपयोगी पडतील अशा काही टिप्स जाणून घेऊ. ज्यामुळे प्रवासाला गेल्यावर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या निर्माण होणार नाहीत.

रोज खात त्रिफळा

त्रिफळा खाल्ल्याने पोट साफ होते. जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा पोट फुगण्याची समस्या असेल तर त्रिफळा खाने फायदेशीर ठरते. तुम्ही कुठे प्रवासाला जात असाल तर प्रवासापूर्वी आणि प्रवासानंतर त्रिफळाचे चूर्ण खा यामुळे पचनक्रिया सुधारते.

हलके अन्न खा

प्रवासात अनेकदा जड अन्न खाल्ल्या जाते. पण सतत बसल्यामुळे अन्न पचत नाही त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. प्रवासादरम्यान नेहमी हलके अन्नच खा. त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होणार नाही.

पुरेसे पाणी प्या

जर तुम्हाला आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर शक्य तितके पाणी पिण्याचा प्रयत्न करा. प्रवास करताना अनेक जण पाणी कमी पितात असे लक्षात येते. त्यामुळे पोट फुगणे आणि ॲसिडिटी होते. या सोबतच आहारामध्ये शक्य झाल्यास लिक्विड आहाराचा समावेश करा.

थोड्या वेळ चाला

प्रवासातून परतल्यानंतर तुमच्या दिनचर्येत चालणे समाविष्ट करा. यामुळे तुमची पचनक्रिया निरोगी राहते. जेवण झाल्याच्या नंतर चालण्याची सवय लावा. यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते आणि पचनाशी संबंधित कोणतीच समस्या उद्भवत नाही. आपण 15 ते 20 मिनिटे रोज चालले तरी पुरेसे आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वारसनोंद पण आता ऑनलाईन; सरकारचे नागरिकांना नववर्षाचे गिफ्ट, असा करा अर्ज वारसनोंद पण आता ऑनलाईन; सरकारचे नागरिकांना नववर्षाचे गिफ्ट, असा करा अर्ज
नवीन वर्षात राज्य सरकारने नागरिकांना आणखी एक गिफ्ट दिले आहे. त्यांना ऑनलाईन वारसा नोंद करता येईल. नागरिकांना ई-फेरफार प्रणालीला पूरक...
पिरियड्सच्या वेदनेमुळे रडत रडत सेटवर पोहोचली अभिनेत्री, दिग्दर्शकाने दिली अशी प्रतिक्रिया
चिमुटभर हिंगाचे ढिगभर फायदे, अपचनापासून ते… जाणून घ्या
10, 12 वी पास आहात, सरकारी नोकरी शोधत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे…
झोपडपट्टीवासीयांना घरे द्या, मी निवडणूक लढवणार नाही; केजरीवालांचे शहांना आव्हान
देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा न दाखल करण्यासाठी कोणाचे फोन आले होते? संदीप क्षीरसागर यांचा सवाल
Champions Trophy मध्ये दमदार कामगिरी करा अन्यथा…; BCCI च्या आढावा बैठकीत मोठा निर्णय