धस, क्षीरसागर आणि टोपे एकाच माळेचे मणी…काय म्हणाल्या अंजली दमानिया ?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्ये प्रकरणातील आरोपींपैकी एका आरोपीने लातूर जेलमध्ये आपली रवानगी करावी असे मागणी कोर्टाकडे केली आहे. या संदर्भात तपासधिकाऱ्याने देखील आक्षेप घेतलेला नाही, त्यामुळे या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आक्षेप घेतला आहे. आपण पोलिस महासंचालक आणि मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहील्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. जे सराईत आणि हार्डकोअर गुन्हेगार आहेत त्यांना जिल्ह्याबाहेरील जेलमध्ये ठेवण्यात यावे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यांनी आपल्याला लातूर जेलमध्ये ठेवण्यात यावे अशी मागणी करणारा अर्ज सीबीआयच्या विशेष न्यायालयात केला आहे. यावर आयओने देखील कोणताही आक्षेप घेतलेला नसल्याने हा धक्कादायक प्रकार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. आपण आजच डीजी आणि चीफ जस्टीसना पत्र लिहून मागणी केली आहे. जे हार्डकोअर क्रिमिनल आहेत. त्यांना जिल्ह्याबाहेरील जेलमध्ये ठेवू नये असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
आपले तर म्हणणे आहे की या सर्व आरोपींना जिल्ह्याच्या बाहेर नेण्याच यावे. कारण या प्रकरणातील अधिकारी आणि तुरुंगप्रशासन या सर्वांवरच दबाव आहे.या आरोपींना मुंबईच्या आर्थर रोडमध्ये ठेवण्यात यावे कारण यंत्रणांवर दबाव येतोय, हे आपण डीजींना सांगणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. वाल्मीक कराड याचे नाव एका गंभीर गुन्ह्यांत वगळण्यात आल आहे, हे प्रकरणही धक्कादायक आहे असेही दमानिया यांनी आरोप केला आहे.
सर्व एकाच माळेचे मणी
बीड प्रकरण मुंबईत ट्रान्सफ करावे. या प्रकरणाचा संपूर्ण तपास व्हावा सर्व पुरावे दिलेले आहेत.आपण डीजींना विनंती करणार आहे की वेंकटेश्वर इंडस्ट्रीज, टर्टल लॉजिस्टिक्स , गणेश कंस्ट्रक्शन कंपन्यांचा गैरव्यवहार बाहेर काढला आहे.व्यंकटेश्वर आणि टर्टलमध्ये धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांनी महाजनकोचं कंत्राट मिळाल्यानंतर औष्णिक प्रकल्पाचील राखेचं कंत्राट घेतलं. महाजनको राज्याची बॉडी, बॅलेंसशीटमध्ये धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांनी सही केली आहे.सुप्रीम कोर्टाने ऑफिस ऑफ प्रोफिटबाबत महत्वाचे विधान केले आहे.राजकिय नेते या बॉडीचा आर्थिक लाभ घेऊ शकत नाहीत, हे तिघे शेयर होल्डर आहेत.आज चिफ जस्टीसकडे याचे पुरावे देणार, जरडेश्वर शुगर मील्सने ६२ कोटी वेगवेगळ्या मार्गाने बॅंकेकडून घेतले आहेत. सुरेश धस, जयदत्त शिवसागर, जालन्याचे राजेश टोपे हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. यांचेही घोटाळे बाहेर आपण काढणार, पण आधी धनंजय मुंडे यांची दहशत बाहेर काढण्यासाठी आपण लढा देणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
अजितदादा दहावी नापास
अजितदादा दहावी नापास, त्यांना अर्थ कळतं का ? आधी पैसे खर्च करतात मग बजट तयार करतात. तुम्ही भाजपमध्ये जा तुमच्या चौकशा संपतात, छगन भूजबळ बाबत ईडीने जो प्रयत्न केला ही बातमी पेरण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे.सगळे पक्ष फोडले, राजकारणाचा सत्यानाश केला आहे अशी जहरी टीका अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List