मोठी बातमी! दावोसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचा डंका; 5 लाख कोटींची विक्रमी गुंतवणूक
सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसच्या दौऱ्यावर आहेत. दावोसमधून महाराष्ट्रासाठी मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दावोस येथे पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक पाच लाख कोटींची गुंतवणूक नोंदवून महाराष्ट्र सरकारने विक्रमी ओपनिंग केली आहे. यामुळे भविष्यात मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाले उदय सामंत?
दावोस येथे पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक पाच लाख कोटींची गुंतवणूक नोंदवून महाराष्ट्र सरकारने विक्रमी ओपनिंग केली आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. सोबतच येत्या तीन महिन्यांमध्ये राज्यात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळेल, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे अनेक आमदार आणि महत्त्वाचे नेते फुटणार आहेत. ते एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्विकारणार आहेत असा दावा देखील यावेळी उदय सामंत यांनी केला आहे.
आज पुन्हा एकदा दावोसमधून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधताना आनंद होत आहे. आजचा दिवस हा महाराष्ट्रासामधील गुंतवणुकीसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. मला सांगताना आनंद वाटतो की, आज दिवसभरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाच लाख कोटीपर्यंतची गुंतवणूक आणण्यात यश मिळालं आहे. उद्या देखील अशाप्रकारची गुंतवणूक आणण्यात यश मिळेल. मी जसं महाराष्ट्रातून दावोसला येत असताना सांगितलं होतं. विक्रमी गुंतवणूक महाराष्ट्रात येईल, त्याला आज सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं आमच्यावर टाकलेला विश्वास महायुतीच सरकार म्हणून आम्ही सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान उदय सामंत यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला होता. फडणवीसांच्या शपथविधीपूर्वीच शिवसेनेत फूट पडणार होती असं त्यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या आरोपाला देखील उदय सामंत यांनी यावेळी उत्तर दिलं आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये राज्यात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळेल, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे अनेक आमदार आणि महत्त्वाचे नेते फुटणार आहेत. ते एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्विकारणार आहेत असं सामंत यांनी म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List