Ladki Bahin Yojana : ‘त्या’ लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे परत घेणार? सर्वात मोठी बातमी समोर
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं गेल्या वर्षी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र लाडकी बहीण योजनेवर होणाऱ्या खर्चाचा परिणाम हा इतर योजनांच्या बजेटवर पडत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे ही योजना सुरू राहणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. ही योजना सुरूच राहणार असल्याचं सरकानं स्पष्ट केलं आहे. मात्र ज्या महिला या योजनेत बसत नाहीत, त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाईल, असं मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं होतं.
तसेच ज्या महिला या योजनेत बसत नाहीत त्यांचे पैसे परत घेतले जाणार की नाही घेतले जाणार याबाबत देखील आता चर्चा सुरू आहे. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना मोठा खुलासा केला आहे.
नेमकं काय म्हणाले रवींद्र चव्हाण?
ज्या महिला नियमात बसत नाहीत त्यांचे पैसे परत घेतले जाणार की नाही घेतले जाणार याबाबत सरकार म्हणून निश्चितपणे निर्णय घेतला जाईल. गेल्या सरकारने ही योजना सुरू केली होती. ही योजना सुरू केली तेव्हा या योजनेचा लाभ कोणाला मिळणार? कोणाला मिळणार नाही याबाबत स्पष्टता होती. त्यानंतर नव्या वर्षामध्ये नव्या सरकारनं या योजनेबाबतच्या अटी, शर्थीमध्ये अधिक स्पष्टता आणली. त्यामुळे पुढील काळात या संदर्भातला निर्णय सरकार म्हणून निश्चित घेतला जाईल, असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे.
जानेवारीचा हाप्ता कधी मिळणार?
गेल्या जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात सहा हाप्ते जमा करण्यात आले आहेत. आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे जानेवारीचा हाप्ता कधी मिळणार याकडे. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे 26 जानेवारीच्या आता लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List