लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत सर्वात मोठी अपडेट
राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी दिली आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात २१०० रुपयांच्या हप्त्याची रक्कम नेमकी कधी पडणार याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. येत्या मार्च महिन्यातील अर्थसंकल्पानंतर हे पैसे महिलाच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. ही योजना बंद करण्याची कोणतीही योजना नसल्याचे देखील जलसंपदा मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकारने विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजना सुरु केली होती. ही योजना जून महिन्यांपासून सुरु झाली आहे. या योजनेत आता १५०० च्या ऐवजी २१०० रुपयांचा हप्ता देण्याचे आश्वासन राज्य सरकारने निवडणूकाच्या जाहीरनाम्यात दिले होते. त्याची पूर्णता अर्थसंकल्पाची मांडणी झाल्यानंतर होणार आहे. आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते मिळालेले आहेत. आता डिसेंबर महिन्याचा लाडक्या बहिणीच्या खात्यावर पडण्यास सरुवात झाली आहे. आता २१०० रुपयाचा हप्ता थेट मार्च महिन्यातील अर्थ संकल्पानंतर मिळणार आहे.
मार्च महिन्यानंतर २१०० रुपये मिळणार
मार्च महिन्यातील बजेटनंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये होणार आहे. महायुती सरकार लाडक्या बहिणींना कधी दूर करणार नाही असे राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरुन 2100 रुपये होणार असल्याचे देखील राधाकृ्ष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List