“मी खुश नाही…” अभिनेत्री मंदाना करिमीचा अभिनय क्षेत्राला राम राम
इराणी अभिनेत्री मंदाना करिमीने अॅक्टींग सोडत असल्याची घोषणा केली आहे. मंदाना करिमी ही बिग बॉस 9 सीजनमध्ये चर्चेत आली होती. मंदानाने कमी वयात मॉडेलिंगमध्ये करिअर सुरु केलं होतं. त्यानंतर तिने बॉलीवूडमधील रॉय, भाग जॉनी, क्या कुल है हम 3 अशा अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले होतं. मात्र सध्या तिने अॅक्टींग करिअर सोडत असल्याचं सांगितलं आहे.
हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मंदानाने सांगितले की, तीने एक वर्ष इंटीरियर डिझायनिंगचा अभ्यास केल्यानंतर ती अभिनय क्षेत्रात उतरली होती. याच क्षेत्रात तिला पुढे जायचं होतं. तिने अनेक संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम केलं आहे. तीला स्वत:च्या पायावर उभं राहायच होतं, म्हणून तिने कमी वयातच मॉडलिंगला सुरुवात केली. मात्र शिक्षण पुर्ण न झाल्याची तीला खंत वाटते.
मंदाना म्हणाली की, तिला कधीही अभिनय किंवा इंडस्ट्री आवडली नाही. ‘मी इंडस्ट्रीत घालवलेल्या वेळेबद्दल आभारी आहे, मात्र ही अशी गोष्ट नाही आहे, ज्याचं मला वेड आहे.”, असं ती म्हणाली. इंटीरियर डिझायनिंगचा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर, मंदाना मॉडेलिंग आणि अभिनयाच्या ऑफर नाकारत होती. ”पैशांना नाही म्हणणं खरोखर कठीण आहे, पण मी सध्या इंटीरियर डिझायनिंगवर माझं सर्व लक्ष केंद्रित करत आहे. माझं आयुष्य खूप बदललं आहे. आणि मी हे सगळं एन्जॉय करतेय”, असंही ती म्हणाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List