मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार – प्रणिती शिंदे
संजय गांधी निराधार योजनेप्रमाणे लाडकी बहीण योजना ही बंद होणार, असं वक्तव्य काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, काँग्रेस होती तेव्हा सिलेंडर फक्त 800 रुपयात मिळत होतं. आता संजय गांधी निराधार योजना बंद झाली. आता लाडकी बहीण योजनाही बंद होणार. ज्या लाडकी बहीणमुळे तुम्ही मतदान केलं, ती लाडकी बहीणही आता सावत्र बहीण झाली, असं त्या म्हणाल्या.
प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ”पैसे घेऊन आनंद फक्त तुम्हाला दोन दिवसांसाठी मिळेल.” त्या म्हणाल्या, ”भाजपला वाटत ते तुम्हाला पैसे देऊन खरेदी करू शकतात. मी बोलून बोलून थकली, आता तुम्हाला समजायला हवं.”
‘निवडणूक आणि राजकारणामध्ये धर्म, जात कशाला आणता’
याआधी जातीय व धार्मिकतेच्या मुद्द्यावर प्रणिती शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. प्रणिती शिंदे म्हणाल्या होत्या की, ”आपल्या देशाचा कणा, देशाचा आत्मा सर्वधर्म समभाव आहे. लग्न, पूजा करायची असेल तर ठीक आहे, पण निवडणूक आणि राजकारणामध्ये धर्म, जात कशाला आणता.” त्या म्हणाल्या होत्या की, ”मी देशासाठी काम करते, मी कोणत्या एका धर्मासाठी समाजासाठी काम करत नाही. जे गरीब आहेत त्याच्यासाठी मी काम करते. आज मला या देशाचे वाईट वाटतेय.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List