एक फोन कॉल आणि मोहम्मद शेहजादचा खेळ खल्लास, सैफ अली खानवरील हल्लोखोरांपर्यंत पोलीस पोहचले कसे? ही Inside Story वाचली का?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला होता. 16 जानेवारी रोजी ही घटना त्याच्या वांद्रेतील फ्लॅटमध्ये घडली होती. मुंबई पोलिसांनी चार दिवसानंतर चकमा देणाऱ्या मोहम्मद शरीफउल इस्लाम शेहजाद मो. रोहिल्ला अमीन फकीर यालाा ठाणे पश्चिममधून अटक केली. पोलिसांनी त्याला रात्री 2-3 वाजता अटक केली. त्यासाठी पोलिसांनी 100 हून अधिक अधिकाऱ्यांची टीम तयार केली होती. एका फोन कॉलमुळे आरोपी पकडला गेला.
हल्ल्यानंतर फोन केला बंद
हल्ला केल्यानंतर आरोपीने फोन बंद केला होता. थोड्यावेळाने त्याने त्याचा फोन पुन्हा सुरू केला. त्याने पुन्हा फोन बंद केला. बाजार अथवा रस्त्यावर काही ठिकाणी सीसीटीव्ही दिसला की आरोपी त्याचा चेहरा झाकून घेत होता. पोलिसांनी त्याचा फोन ट्रेस करून त्याला पकडले. त्याचा फोन जिथे जिथे ॲक्टिव्ह झाला, त्याचा सर्व डाटा पोलिसांनी गोळा केला.
असा फसला मोहम्मद
पोलिसांनी सैफ याचे घर, वांद्रे रेल्वे स्टेशन, दादर याठिकाणी मोबाईल नंबरचा डाटा गोळा केला. त्यावेळी मोहम्मद याचा मोबाईल तीन ठिकाणी ॲक्टिव्ह झाल्याचे दिसले. त्यात त्याने एका मोबाईल क्रमांकावर कॉल केल्याचे दिसून आले. पोलिसांनी तो मोबाईल क्रमांक मिळवला. त्यावर कॉल केला. तो आरोपींच्या ओळखीतलाच असल्याचे समोर आले. पोलिसांनी मग त्याचा माग काढला. तो ठाण्यात असल्याचे समोर आले. मजूरांसोबत तो काही काळ वास्तव्या असल्याचे आणि जंगलात लपल्याचे समोर आले. पोलिसांचे काम एकदम सोपे झाले.
रात्री 2 वाजता ठाण्यातून केली अटक
यानंतर पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी विविध पथकं तयार केली. 30 पोलीस टीम तयार झाल्या. ठाण्यातील पश्चिम भागातील हिरानंदानी इस्टेटमधील टिसीएस कॉल सेंटरमागील मेट्रोचे काम सुरू होते. तिथे लेबर कॅम्प आहे. पोलिसांनी तिथे छापा टाकला. आरोपी जवळच असलेल्या जंगलात लपलेला होता. पोलिसांनी त्याला रात्री 2 वाजता अटक केली. आरोपीचे नाव मोहम्मद शरीफउल इस्लाम शेहजाद मो. रोहिल्ला अमीन फकीर आहे. तो बांगलादेशातील झलोकाठी या जिल्ह्यातील राजाबरीया येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. तो 30 वर्षांचा आहे. त्याने भारतात घुसखोरी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List