सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे खरं नाव काय? तो नेमका कुठला? पोलिसांनी अख्खी कुंडलीच काढली

सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे खरं नाव काय? तो नेमका कुठला? पोलिसांनी अख्खी कुंडलीच काढली

Saif Ali Khan Attacker Arrested : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अलियान उर्फ ​​विजय दास असे या आरोपीचे नाव आहे. विजय दास याला ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. तो पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील रहिवाशी आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक केलेला आरोपीच्या नावांबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सापळा रचत मुख्य आरोपीला अटक

मुंबई पोलिसांनी सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला ठाण्यातून अटक केली आहे. ठाण्यातील कासारवडवली भागातून मध्यरात्री ३ च्या सुमारास ही अटक करण्यात आली आहे. आरोपी विजय दासला ठाण्याच्या लेबर कॅम्पजवळील जंगलातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तब्बल २०० जण असलेल्या पोलिसांच्या पथकाने सापळा रचत मुख्य आरोपीला अटक केली आहे. यानंतर त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्याने एक-दोन नव्हे तर चार नावे सांगितली आहेत.

चौकशीदरम्यान सांगितली विविध नावे

पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर मध्यरात्री त्याला चेंबूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. यावेळी मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांचच्या टीमकडून आरोपीची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान त्याने त्याची विविध नावे सांगितली. पोलिसांनी सुरुवातीला केलेल्या चौकशीत त्याने बिजॉय दास असे म्हटले. यानंतर त्याने विजय दास असे सांगितले. यानंतर त्याने मोहम्मद इलियास आणि बीजे असे स्वत:चे नाव असल्याचे उघड केले. आरोपीकडून वारंवार नाव बदलले जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याचे खरं नाव काय याचा शोध सुरु होता.

पोलिसांनी कुंडलीच काढली

अखेर आता पोलिसांनी केलेल्या तपासानंतर त्याचे खरे नाव समोर आले आहे. अभिनेता सैफ अली खानवर यांच्या घरी जबरी चोरी आणि हल्ल्याची जी घटना झाली, त्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे आहे. त्याचे वय ३० वर्ष असे आहे. हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न होत आहे. तो मूळचा बांग्लादेशच्या झलोकोठी जिल्ह्यातील राजाबरीया थाना नॉलसिटी या गावातील येथील रहिवासी असल्याची माहिती डीसीपी दीक्षित गेडाम यांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्यांना आरक्षण घ्यायचंय ते घेतील, ज्यांना नको ते नाही घेणार, जरांगे यांनी राणेंना स्पष्ट सुनावणे ज्यांना आरक्षण घ्यायचंय ते घेतील, ज्यांना नको ते नाही घेणार, जरांगे यांनी राणेंना स्पष्ट सुनावणे
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणांवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना स्पष्टच सुनावणे आहे. कुणबी आणि क्षत्रिय देखील आम्हीच...
‘…तर त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही,’पालकमंत्री पद न मिळाल्याने गोगावले संतापले
एक फोन कॉल आणि मोहम्मद शेहजादचा खेळ खल्लास, सैफ अली खानवरील हल्लोखोरांपर्यंत पोलीस पोहचले कसे? ही Inside Story वाचली का?
Bigg Boss 18 फिनालेमध्ये पोहोचण्यासाठी ‘या’ स्पर्धकाने निर्मात्याला दिली मोठी रक्कम? नक्की काय आहे सत्य
‘माय नेम इज जान’चा दिल्लीत सोलो म्यूजिकल प्ले; केंद्रीय मंत्री शेखावत म्हणाले, या नाटकाचे अनेक शो व्हायला हवे
अटक होण्याच्या भीतीने आरोपी करत होता असं काम, तपासात धक्कादायक माहिती समोर
सोने चांदी नाही तर केसांवर जडला चोरांचा जीव, व्यापाऱ्याच्या घरात 150 किलो वजनाच्या केसांवर डल्ला