Saif Ali Khan Attack : मुंबई पोलिसांच्या हातावर हल्लेखोराच्या तुरी, तपासासाठी पोलीस या राज्यात, ओढावली मोठी नामुष्की
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्लाप्रकरणात अजून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हल्लेखोराने मुंबई पोलिसंच्या हातावर तुरी दिल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांचे 35 पथकं नेमून सुद्धा तो मुंबई बाहेर पळण्यात यशस्वी ठरल्याचे समोर येत आहे. विरोधक या प्रकरणात धार्मिक अँगल असल्याचा दावा करत आहेत. यामुळे आता याप्रकरणाला गंभीर वळण मिळाल्याचे दिसून येत आहे.
दादरमध्ये खरेदी केला हेडफोन
सैफ अली खान याच्यावरील हल्लाप्रकरणातील आरोपी हा काही काळ दादर परिसरात असल्याचे दिसून आले आहे. त्याने दादर रेल्वे स्टेशन परिसरातील एका दुकानातून हेडफोन खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. त्याने या दुकानातून 50 रुपयांचा हेडफोन खरेदी केला. तो या दुकानात आल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. आरोपीचा चेहरा स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झाला. सैफच्या परिसरातील डेटा डम्प करण्यात आला. तरीही दोन दिवसांपासून हल्लेखोर पोलिसांना झुंजवत असल्याने तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बातमी अपडेट होत आहे…
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List