Rakhi Sawant : ‘सैफू करुची फिकीर करं, बेडरुम, बाथरुममध्ये…’, राखी सावंतची पहिली प्रतिक्रिया, VIDEO
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री भयानक हल्ला झाला. घरात घुसलेल्या चोराने सैफ अली खानला धारदार शस्त्राने भोसकलं. या हल्ल्यामुळे सगळ्या मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. सैफ अली खान वांद्र्याला सतगुरु शरण या इमारतीत 12 व्या मजल्यावर राहतो. चोर इतक्या उंचावर सैफच्या घरापर्यंत पोहोचलाच कसा? हा प्रश्न निर्माण झालाय. सैफच्या इमारतीत सुरक्षा व्यवस्था नव्हती का? उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या या भागात अनेक सेलिब्रिटी राहतात, तिथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाहीय का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत. सैफ अली खानवर झालेल्या या हल्ल्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी व्यक्त झाले आहेत. आता आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या राखी सावंतची प्रतिक्रिया आली आहे.
“अरे देवा, किती वाईट बातमी, माझ्या संघर्षाच्या दिवसात राकेश रोशन यांच्या चित्रपटात मी सैफ अली खानसोबत एक गाणं केलं होतं. सैफूसोबत इतकं वाईट घडेल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता” असं राखी सावंत म्हणाली. “हे बिल्डिंग वाले काय करतात? महिन्याला इतके पैसे घेता आणि सीसीटीव्ही कॅमेर सुद्धा लावू शकत नाही? किती वाईट बातमी आहे ही” अशा शब्दात राखीने संताप व्यक्त केला. “2025 मध्ये हे काय सुरु आहे? इतक्या दिग्गज लोकांसोबत काय सुरु आहे?” असे प्रश्न राखी सावंतने विचारले आहेत.
‘सैफ इतका करोडपती आहेस, मग…’
“मी दुबईत बसली आहे. ही खरच धक्कादायक बातमी आहे. सैफ अली खान करीना कपूरच्या घरात चोराने घुसून त्यांच्यावर चाकूने वार केले. ओह माय गॉड, सैफ इतका करोडपती आहेस, मग सीसीटीव्ही कॅमेरे का लावले नाहीस? मजल्यावर, इमारतीत कारच्या जवळ घराच्या आत कॅमेरे का लावले नाहीस?. इतके नोकर-चाकर आहेत, मग कॅमेरे का लावले नाहीस?” असा सवाल राखी सावंतने विचारलाय.
‘करीनाची फिकीर करं’
“प्रत्येक जागी बेडरुम, बाथमरुमध्ये कॅमेरे लावं. पर्सनल लाइफच जे आहे, ते डिलीट करं. आता बघं किती महाग पडलं. एका मोठा स्क्रीन बसवं. घराच्या बाहेरुन कोण आत येंत, बाहेर जातं, ते सर्व रेकॉर्ड होतं. अरे, तू सेलिब्रिटी आहेस. तुला स्वत:ची फिकीर नसेल, तर करीनाची फिकीर करं. करीना माझी जान आहे, माझी मैत्रीण आहे. सैफू करुची फिकीर करं” असा राखी सावंतने त्याला सल्ला दिला. “सैफू तू खरा हिरो निघालास. मी तुझे रेस 1,2,3 चित्रपट बघितलेत. मला वाटायच अक्षय कुमारच स्टंट करतो, पण तू पण रिअल हिरो निघालास” असं राखी सावंत म्हणाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List