सहा वार, मणक्यात घुसला चाकूचा तुकडा.. सैफवरील शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांची माहिती

सहा वार, मणक्यात घुसला चाकूचा तुकडा.. सैफवरील शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांची माहिती

अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला झाला असून लिलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एका अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात प्रवेश केला आणि त्याने अभिनेत्यावर हल्ला केला. आरोपीने सैफवर चाकूने सहा वार केले आहेत. आता लिलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. सैफवर न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया करून त्याच्या मणक्यातून अडीच इंचाचा चाकूचा तुकडा काढण्यात आलं आहे.

“सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. त्याच्यावरील न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी पूर्ण झाली आहे. सैफला ऑपरेशन थिएटरमधून आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे. एक दिवस त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर डिस्चार्जबद्दल निर्णय घेऊ. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो लवकरच बरा होईल. सैफवरील दोन जखमा खोलवर असून दोन मध्यम स्वरुपाच्या जखमा आहेत. तर दोन खरचटलेल्या स्वरुपाच्या जखमा आहेत. त्याचप्रमाणे अडीच इंचाचा चाकूचा तुकडा आम्ही त्याच्या मणक्यातून काढला आहे,” अशी माहिती लिलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. नीरज उत्तमणी यांनी दिली.

तर सैफवर शस्त्रक्रिया केलेले न्यूरोसर्जन नितीन डांगे म्हणाले, “सैफ अली खानला मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सैफच्या मणक्याला जबर दुखापत झाली होती. त्याच्या मणक्यात चाकूचा तुकडा घुसला होता. तो तुकडा काढण्यासाठी आम्ही सर्जरी केली आणि स्पायनल फ्लुएडचं लीकेज थांबवण्यासाठी उपचार करण्यात आले. त्याच्या डाव्या हातावर दोन खोलवर जखमा होत्या. त्याचसोबत मानेवरील जखमेवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. सैफची प्रकृती आता स्थिर आहे. तो उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून त्याच्या प्रकृतीला आता धोका नाही.”

सैफ अली खानवर हल्ला करणारी व्यक्ती ही रात्रभर त्याच्या घरात दबा धरून बसली होती, अशीही माहिती समोर येत आहे. रात्री दोन वाजता त्याच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांशी वाद सुरू असल्याचा आवाज सैफला आला. हा आवाज ऐकून तो बाहेर आला, तेव्हा चोराने त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोर हा घरातील महिला कर्मचाऱ्यांशी संबंधित होता का? तो आत कसा आला? तो चोरी करण्यासाठी आला होता का? याचा पोलीस तपास करत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राष्ट्रवादीकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अजितदादा, पार्थ पवारांसह या दिग्गज नावांचा समावेश राष्ट्रवादीकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अजितदादा, पार्थ पवारांसह या दिग्गज नावांचा समावेश
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचाराकांची यादी जाहीर करण्यात आली आहे....
गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात मोठी बातमी, अखेर वर्षभरानंतर या आरोपीला बेड्या
सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा कोण होता? खून करण्याच्या उद्देशाने घरात शिरलेला का? गृहराज्य मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
सैफ अली खानचे ते 9 चित्रपट ज्यावर करोडो रुपये लागलेत; हल्ला झालेल्या घटनेचा परिणाम होणार का?
सैफ अली खानच्या हत्येचाच हेतू होता का? बॉलिवूडच्या व्हिलनला संशय; म्हणाले, ही तर लज्जास्पद…
सैफवरील हल्ल्यानंतर सुप्रिया सुळेंची मोठी मागणी, म्हणाल्या जशी देशमुख, सुर्यवंशी कुटुंबाला…
Saif Ali Khan वर ज्या घरात हल्ला झाला, ते किती आलिशान Inside PHOTOS बघा