आवडत्या मालिकांमधील लाडक्या कलाकारांनी साजरा केला उत्सव मकरसंक्रांतीचा
झी मराठी वाहिनीवर मकरसंक्रांतीच्या पूर्व संध्येला मकरसंक्रांतीचा उत्सव रंगणार आहे. ज्यात झी मराठीवरील सर्व कलाकार एकत्र येऊन संक्रांत साजरी करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
या सोहळयात प्रेक्षकांना अनेक धमाकेदार परफॉर्मन्सेस पाहता येणार आहेत. या सोहळयाचं खास आकर्षण म्हणजे शिवा आणि आशुचा खास गावरान शेतकरी डान्स, पारू आणि आदित्यचा सिंड्रेला राजकुमार परफॉर्मन्स.
सोबतीलाच सोहळ्यातील लक्षवेधी परफॉर्मन्स आहे, डॅडी म्हणजेच गिरीश ओक आणि बाई आज्जी म्हणजे सविता मालपेकर यांचा पुष्पा स्पेशल डान्स. अहिल्यादेवी-श्रीकांतचा बाहुबली डान्स आणि इतर अनेक मजेशीर खेळही रंगणार आहेत.
अनोखं हळदीकुंकूही प्रेक्षकांना या सोहळ्यात पाहता येणार आहे. ज्यात लक्ष्मीकडून झी मराठी वाहिनीवरील सर्व सुवासिनींना हळदी कुंकू आणि वाण देऊन संक्रांतीच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यात येणार आहे.
या खास कार्यक्रमाबद्दल बोलताना 'नवरी मिळे हिटलरला'मधील लीला म्हणजेच वल्लरी विराजने सांगितलं, "2025 ची आमची सुरुवात जल्लोष आणि उत्सवात झाली. वर्षाचा पहिला सेलिब्रेशनचा क्षण होता."
आम्ही सर्व झी मराठी कुटूंब एकत्र भेटलो, खूप मज्जा आली, गप्पा झाल्या. झी मराठी कुटुंबामध्ये आम्ही जेवढे नवं विवाहित आहोत ते सर्व हलव्याचे दागिने घालून सजलो होतो, गाणी गायलो, खेळ खेळलो, आणि छान नाचलोही आहोत," असं तिने पुढे सांगितलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List