न्यू इअर पार्टीतील आर्यन खानच्या मद्यपानाच्या व्हिडीओवर समीर वानखेडे स्पष्टच बोलले..

न्यू इअर पार्टीतील आर्यन खानच्या मद्यपानाच्या व्हिडीओवर समीर वानखेडे स्पष्टच बोलले..

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला 2021 मध्ये ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केली होती. एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे हे प्रकरण हाताळत होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत समीर यांनी त्या प्रकरणावर मौन सोडलं आहे. आर्यन खानवरील कारवाईनंतर त्यांना बऱ्याच टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं. याविषयी ते ‘झूम एंटरटेन्मेंट’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “ट्रोलिंग हे माझ्यासाठी एकप्रकारचं मनोरंजन आहे. मी यापेक्षाही वाईट गोष्टी झेलल्या आहेत… गोळ्या, दहशतवादी. त्यांच्यापुढे ही खूप छोटी गोष्ट आहे. धमकीचे मेसेज जरा विनोदीच असतात.” कायदा सर्वांसाठी समान असतो असं म्हणत काहींनी कौतुक केल्याचंही त्यांनी सांगितलं.

आर्यन खानच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वी आर्यनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये तो नवीन वर्षाच्या पार्टीत मित्रांसोबत मद्यपान करताना दिसला होता. या व्हिडीओबद्दल वानखेडे म्हणाले, “मला त्या व्यक्तीबद्दल काही प्रतिक्रिया द्यायची नाही. पण जर तुम्ही थर्टी फर्स्टच्या पार्टीबद्दल बोलत असताल तर आजकालच्या तरुणांना वाटतं की नवीन वर्षाच्या आधीची संध्याकाळ ही उधळपट्टी करण्यासाठीत असते. लोकांनी एंजॉय केलं पाहिजे यात काही शंका नाही. पण त्यासाठी तुम्ही शरीराला त्रास देऊ नका.”

‘जवान’मधील डायलॉगबद्दल काय म्हणाले?

आर्यन खानच्या अटकेच्या प्रकरणानंतर 2023 मध्ये शाहरुखचे ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. त्यापैकी ‘जवान’ या चित्रपटात शाहरुखच्या तोंडी असलेला एक डायलॉग तुफान चर्चेत आला होता. “बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से बात कर” (मुलाला हात लावण्याआधी बापाशी बोल), असा हा डायलॉग होता. हा डायलॉग जाणूनबुजून चित्रपटात समाविष्ट केल्याचं म्हटलं जात होतं. समीर वानखेडे यांना उद्देशूनच हा डायलॉग त्यात लिहिण्यात आला होता, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये झाली होती. याविषयी समीर म्हणाले, “अनेकांनी असं म्हटलं होतं की तो डायलॉग माझ्यासाठीच होता. पण मला तसं वाटत नाही. मी त्यांच्यासाठी इतका महत्त्वाचा नाही की त्यांच्या चित्रपटात ते माझ्यासाठी डायलॉग लिहितील. जरी तो माझ्यासाठी असला तरी मी ते कौतुक म्हणून स्वीकारेन आणि त्यातील शब्दांबद्दल बोलायचं झाल्यास, ते थर्ड ग्रेड शब्द होते. भारतीय संस्कृतीत असे शब्द वापरले जात नाहीत.”

आर्यनकडे ड्रग्ज सापडले नसतानाही अटक का?

आर्यनकडे कथितपणे ड्रग्ज सापडले नसतानाही त्याला अटक का केली असा सवाल विचारला असता वानखेडे यांनी सांगितलं, “मी या प्रकरणाबद्दल काही अंदाज लावत नाही. पण एक गोष्ट लोकांनी समजून घेणं आवश्यक आहे की जेव्हा एखादं ड्रग्ज तयार केलं जात असतं, तेव्हा त्यात पुरवठादार आणि ग्राहक अशा दोन बाजू असतात. जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने या प्रक्रियेत सहभागी असलेल्या एखाद्या व्यक्तीला अटक केली असेल तर असं गृहीत धरलं जातं की ज्या व्यक्तीने ग्राहकांना ड्रग्ज पुरवले त्याला अटक केली जाऊ नये? अर्थातच त्यांच्याकडे ड्रग्ज उपलब्ध असणार नाहीत, कारण त्यांनी ते आधीच संबंधित पक्षाला दिलेले असतात.”

जेव्हा वानखेडे यांनी आर्यनला अटक केली, तेव्हा आर्यनने त्यांना “तू जानता नहीं मेरा बाप कौन है?” असं म्हणून दाखवल्याची चर्चा होती. यात काही तथ्य आहे का, असा प्रश्न समीर यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट केलं, “मला अशा गोष्टींवर प्रतिक्रिया द्यायची नाही. सर्वकाही मी कोर्टात सादर केलं आहे. जरी एखाद्या वेगळ्या केसमध्ये जर अशी भाषा वापरली जात असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल. माझ्यासोबत अशा पद्धतीची भाषा चालत नाही.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘घरगडी असणारा माणूस पाच हजार कोटींचा मालक होतो, म्हणजे किती…,’ काय म्हणाले विजय शिवतारे ‘घरगडी असणारा माणूस पाच हजार कोटींचा मालक होतो, म्हणजे किती…,’ काय म्हणाले विजय शिवतारे
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर या प्रकरणात एक महिन्यांनंतर आठ आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. या...
संसारात पैशांचं महत्व अन् पैसे कसे वाचवायचे? अभिनेत्रीने सांगितला सोपा अन् महत्वाचा पर्याय
स्वकष्टाने उभारलेलं हे आमचं ‘एकम’..; अमृता खानविलकरचा नव्या घरात गृहप्रवेश
‘गदर 2’ची ‘सकीना’ तिच्यापेक्षा 18 वर्षांनी लहान बिझनेसमनला करतेय डेट?
ब्रेकअपनंतर मलायका आणि अर्जुन फॅशन शोमध्ये एकत्र; पण घडलं वेगळंच
मनीषा कोईरालाचा डेटिंग लाइफबद्दल खुलासा; म्हणाली “कोण म्हणतं की माझ्या आयुष्यात..”
भाजपने बनवले बोगस मतदार, खटला चालवण्याची वकील प्रशांत भुषण यांची मागणी