अक्षय कुमारने शेअर केला पत्नीचा भन्नाट व्हिडीओ; पाहून अर्जुन कपूर म्हणाला ‘टीना का तांडव’
अभिनेत्री, लेखिका आणि अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना आज (29 डिसेंबर) तिचा 50 वा वाढदिवस साजरा करतेय. यानिमित्त चाहत्यांकडून सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच अक्षय कुमारने पत्नीला आपल्या हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयने ट्विंकलचा एक मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओसोबतच त्याने पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. अक्षयने पोस्ट केलेल्या या व्हिडीओ ट्विंकल खन्नाच्या स्वभावाचे दोन्ही पैलू पहायला मिळतात. ‘माझी पत्नी कशी आहे, याबद्दल प्रत्येकाला काय वाटतं आणि ती खऱ्या आयुष्यात कशी आहे’, असं दाखवणारे दोन व्हिडीओ अक्षयने पोस्ट केले आहेत.
या व्हिडीओच्या सुरुवातीला ट्विंकल पुस्तक वाचताना दिसून येत आहे, तर नंतर ती अत्यंत हास्यास्पद पद्धतीने डान्स करताना दिसते. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘तेरे वरगा नहीं कोई टीना’ हे गाणं ऐकायला मिळतंय. यासोबतच अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा टीना. तू फक्त एक स्पोर्ट नाहीत, तू संपूर्ण खेळ आहेस. मला तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळालं. पोट दुखेपर्यंत कसं हसायचं (बहुतांश वेळा तूच यासाठी कारणीभूत असतेस), रेडिओवर आवडीचं गाणं वाजताच कशाप्रकारने दिलखुलासपणे गायचं आणि केवळ मनाला वाटतं म्हणून मोकळेपणे कसं नाचायचं.. तुझ्यासारखं खरंच दुसरं कोणी नाही.’
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी 2001 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर ट्विंकलने अभिनयक्षेत्राला रामराम केला. मात्र लिखाण क्षेत्रात तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली. ट्विंकलने काही पुस्तकंसुद्धा लिहिली आहेत. अक्षय आणि ट्विंकल यांना आरव हा मुलगा आणि नितारा ही मुलगी आहे. ट्विंकलने 2002 मध्ये आरवला जन्म दिला. त्यानंतर 2012 निताराचा जन्म दिला. आरव आणि नितारा यांच्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे. आरवच्या दिसण्याचं अनेकदा नेटकऱ्यांकडून कौतुक होतं. तर निताराचा चेहरा ट्विंकल आणि अक्षयने बरीच वर्षे सोशल मीडियावर दाखवलं नव्हतं. अनेकदा ते तिचे पाठमोरे किंवा ज्यात तिचा चेहरा दिसणार नाही असेच फोटोच पोस्ट करायचे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List