हिवाळ्यात कोरडेपणामुळे सतत अंगाला खाज सुटतेय? करा हे घरगुती उपाय लगेच मिळेल आराम

हिवाळ्यात कोरडेपणामुळे सतत अंगाला खाज सुटतेय? करा हे घरगुती उपाय लगेच मिळेल आराम

उन्हाळ्यात घामामुळे खाज सुटते तसंच हिवाळ्यातही त्वचा कोरडी पडल्यामुळेहा खाज सुटतेच. त्वचेला खाज येणे ही अतिशय त्रासदायक गोष्ट आहे. आपण जितके खाजवू तितकी ती जास्तप्रमाणात वाढते. अतिप्रमाणात खाजवल्यास त्वचेचा संसर्ग होण्याचा धोका असतो. यासाठी सुरुवातीला घरगुती उपाय करून पाहणे नक्कीच फायद्याचे ठरू शकते.

पाहुयात घरगुती उपाय कोणते आहेत ते

1) खोबरेल तेल
कधी त्वचेच्या कोरडेरपणामुळे तर कधी कीटकाच्या दंशामुळे शरीराला  खाज येण्याची शक्यता असते. अशावेळेस त्यावर खोबरेल तेल चोळल्यास त्यापासून आराम मिळवण्यास नक्कीच मदत होते. जर शरीरावर सर्वत्र खाज सुटत असेल तर  संपूर्ण शरीरावर खोबरेल तेल लावणे नक्कीच चांगले.

2) पेट्रोलियम जेली
जर तुमची त्वचा खुपच संवेदनशील असेल आणि कोणतीही मॉइश्चराईजर तुमला सुटच होत नसेल तर सरळ पेट्रोलियम जेली लावा. त्याचा फारच उपयोग होईल. पेट्रोलियम जेलीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याने त्वचा मऊ राहण्यास मदत होते. त्यामुळे खाज कमी होऊन त्वचेचा लालसरपणाही कमी होतो.

3) लिंबू
व्हिटामिन सी’ने युक्त  लिंबात ब्लिचिंग क्षमतादेखील असल्याने त्वचेची खाज कमी होण्यास  मदत होते. तसेच लिंबामुळे त्वचेत होणारी दाहकता कमी होते. त्वचेच्या ज्या भागावर  खाज सुटते तेथे लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकल्यास. हे थेंब सुकू द्या. काहीवेळाने तुम्हाला त्रास कमी होत असल्याचे जाणवेल. कदाचित सतत खाज सुटत असल्याने लिंबाचे थेंब टाकल्याने काही सेकंद हलकीशी जळजळ होईल पण नंतर शांत होईल. हा उपाय करून झाल्यानंतर खोबरेल तेल किंवा पेट्रोलियम जेली लावायला विसरू नका.

4) बेकिंग सोडा
शरीराच्या लहानशा भागावर येणार्‍या खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोडा फारच उपयुक्त आहे. तीन लहान चमचे सोडा घेतला तर त्यात थोडे पाणी एकत्र करून त्याची पेस्ट करा व  खाज येणार्‍या भागावर लावा. मात्र त्वचेवर चिर गेली असल्यास किंवा  जखम असल्यास हा उपाय करू नका नाहीतर त्रास होऊ शकतो. शरीरभर खाज सुटत असेल तर कपभर सोडा ,कोमट पाण्याच्या बाथटब मध्ये टाकून आंघोळ करा.

5) तुळस
तुळशीतील औषधी गुणधर्म शरीरावरील खाज कमी करण्यास मदत  करतात. तुळशीची पानं त्वचेवर खाज येत असलेल्या भागावर चोळा. किंवा  पाण्यात काही तुळशीची पाने टाकून काढा बनवा. त्या पाण्यात कापसचा बोळा किंवा कपडा बुडवून तो खाज येत असलेल्या भागावर लावा. त्यामुळे तेथील जंतू मरण्यास मदत होईल आणि खाजही कमी होईल

6) कोरफड
कोरफडातील औषधी गुणधर्म देखील त्वचेला थंडावा देण्यास मदत करतात. कोरफडातील गर खाज येत असलेल्या भागावर लावा. काही मिनिटे तसेच राहू द्या. यामुळे खाज कमी होण्यास मदत होईल.

शरीराला खाज सुटत असल्यास खाजवून त्वचेची हानी करण्यापेक्षा हे काही घरगुती उपाय करा. मात्र वेळीच आराम न मिळाल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण काहा वेळेला कपड्याची, अन्नपदार्थांची किंवा पाण्याची, धुळीची अ‍ॅलर्जी असू शकते असल्यास खाज सुटू शकते.त्यामुळे शरीरावर खाज येण्याचे कारण माहित करून घेणे महत्त्वाचे असते. त्याचे योग्य निदान झाल्यास योग्य ते उपचार तुम्हाला मिळतील. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे म्हत्त्वाचे आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘राजकारणात उद्या काय होईल ते सांगता येईल का?’; उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य?  ‘राजकारणात उद्या काय होईल ते सांगता येईल का?’; उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य? 
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं कामकाज कुठपर्यंत झालं हे पाहण्यासाठी...
शिवसेनाप्रमुखांनी आत्मचरित्र का लिहिले नाही…उद्धव ठाकरे यांनी दिले उत्तर
गौरी खानचं खरं नाव माहितीये का? गौरीनेलग्नावेळी शाहरूखचंही बदललं होतं नाव
वामिका-अकायसोबत विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला; मागितली ‘ही’ गोष्ट
कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने कॅन्सर होतो का? जाणून घ्या
पाकला घेरलं; तालिबानचा सैन्याच्या चौक्यांवर हल्ला, अणु प्रकल्पातील 16 कामगारांचं अपहरण
मराठमोळ्या सायलीचे पदार्पण आणि टीम इंडियाची विजयी सुरुवात, आयर्लंडचा केला 6 विकेटने पराभव