‘आई तुळजाभवानी’ मालिकेत दैवी दर्शनाचा परमोच्च बिंदू; पृथ्वीवर भवानीशंकर रुपात अवतरणार महादेव
कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' मालिकेत भक्तांच्या मनाला भिडणारे अनेक प्रसंग बघायला मिळाले. बलाढ्य असुरांचा वध करणारी देवी तुळजाभवानी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची आई आहे.
मायेने जवळ घेणारी, लेकरांचा हट्ट पुरवणारी, योग्य मार्ग दाखवणारी आणि आपल्यावर संकट आलं तर त्वरित धावणारी अशी 'आई तुळजाभवानी'ची महागाथा सध्या कलर्स मराठीवर सुरु आहे.
भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येत दुष्टांचा नाश करणारी देवी त्वरिता - तुळजा ते भक्तांवर अपरंपार माया करणारी आई तुळजाभवानी हा प्रवास कसा घडला हे प्रेक्षकांना बघायला मिळत आहे.
सध्या मालिकेच्या कथाभागात कद्दारासूरने गावात उच्छाद मांडला होता. त्याने प्रत्येक भक्ताचं जगणं अवघड केलं होतं. नुकत्याच समोर आलेल्या भागामध्ये त्याने शिवकन्या अशोकसुंदरीला देखील आपल्या मायाजाळमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केला, जो महादेवांनी उधळून लावला.
आता अखेर मालिकेत कद्दारासूराचा वध आई तुळजाभवानीच्या हातून होणार आहे. हे घडत असतानाच आई तुळजाभवानीची मदत करण्यासाठी भूतलावर भवानीशंकर रूपात महादेव येणार आहेत.
तुळजाभवानीच्या भक्तांसाठी कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' मालिकेचा महत्वपूर्ण कथाभाग आता उलगडणार आहे. दैवी दर्शनाचा परमोच्च बिंदु गाठणार आहे.
महादेव पृथ्वीवर भवानीशंकर रूपात अवतरणार असून संकटात सापडलेल्या देवीच्या मदतीला देवांचे देव महादेव येत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List