संक्रांतीला हुरडा, ज्वारीची भाकरी ‘करपणार’

संक्रांतीला हुरडा, ज्वारीची भाकरी ‘करपणार’

गतवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही इंदापूर तालुक्यातला ज्वारीचा पेरा 36 टक्क्यांपर्यंत पोहोचलेला नाही. सरासरीपेक्षा जवळपास दोनशे टक्के पेरणी झालेल्या मक्याच्या पिकाला ही लष्करी अळीची दृष्ट लागली आहे. त्यामुळे यंदाच्या मकरसंक्रांतीसाठी हुरडा मिळणे दुरापास्त आहे. नंतरच्या काळात ज्वारीची भाकर खाणे हे खिशाला न परवडणारे ठरणार आहे.

रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जाणारा इंदापूर तालुका मागील दहा वर्षांपासून फळबागा विशेषतः द्राक्ष, डाळिंबांसाठी प्रसिद्ध आहे. रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणून दहा वर्षांपूर्वी ज्वारीचे नाव घेतले जात असे. मात्र, ज्वारीची कमी उत्पादकता व मजुरांची कमतरता यामुळे गव्हासारख्या तुलनेने उत्पादनास सोप्या व कमी मजुरांवर येणाऱ्या पिकांकडे शेतकरी वळला.

ज्वारीचा पेरा घटला; लष्करी अळीचा हल्ला

धान्याच्या माध्यमातून कष्ट वाया जाऊ न देणारे मक्याचे पीक दुभत्या जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न सोडवत असल्याने दूध उत्पादनाचा जोडधंदा करणारे शेतकरी मक्याचे पीक घेऊ लागले. पुढे अधिकच्या फायद्यासाठी फळबागांच्या लागवडीखाली क्षेत्र येऊ लागले. या तीनही पिकांनी ज्वारीच्या क्षेत्रावर अतिक्रमण केले. त्यामुळे ज्वारीच्या क्षेत्रात उत्तरोत्तर घट होऊ लागली.

रब्बी ज्वारीचे तालुक्यातील सरासरी क्षेत्र 12 हजार 759 हेक्टर आहे. गेल्या वर्षी केवळ 4 हजार 700 हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. यंदाच्या वर्षी त्यामध्ये 109 हेक्टरने घट झाली. 4 हजार 591 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झालेली आहे. 35.98 अशी तिची टक्केवारी आहे. इंदापूर (855 हेक्टर) बावडा (1 हजार 571 हेक्टर), सणसर (949 हेक्टर) व भिगवण (1 हजार 216) अशी पेरणीची वर्गवारी आहे. यंदाच्या वर्षी 197.4 टक्के पेरणी झालेल्या मक्याच्या पिकाला लष्करी अळीची दृष्ट लागली आहे. त्यामुळे या पिकावर संक्रांत आली आहे. मक्याचे सरासरी क्षेत्र 7 हजार 377 हेक्टर आहे. तब्बल 14 हजार 536 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. सणसर परिसरात सर्वाधिक 4 हजार 959 हेक्टर, त्या खालोखाल बावडा (3 हजार 733 हेक्टर), इंदापूर (2 हजार 935 हेक्टर) व भिगवण (2 हजार 909 हेक्टर) अशी पेरणीच्या क्षेत्राची वर्गवारी आहे.

या भागात बागायती ज्वारी

निमसाखर- (160 हेक्टर), खोरोची (130 हेक्टर), निरवांगी (125 हेक्टर), रेडा (120 हेक्टर), सराफवाडी (95 हेक्टर). जिरायती ज्वारी तरंगवाडी (72 हेक्टर), कळस – (70 हेक्टर), लाकडी (67 हेक्टर), गोखळी (55 हेक्टर), इंदापूर (51 हेक्टर).

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनी परत केलेल्या पैशाचं काय होणार?; आदित्य तटकरे यांनी केली मोठी घोषणा Mukhyamantri Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनी परत केलेल्या पैशाचं काय होणार?; आदित्य तटकरे यांनी केली मोठी घोषणा
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’बाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. पडताळणी पूर्वी 4 हजार महिलांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली...
पीएम किसान योजनेत मोठा बदल; घरातील या सदस्यांचा पत्ता कट, बनवाबनवी करणारे रडारवर, नवीन नियमावली वाचली का?
सैफचा हल्लेखोर कसा सापडणार? पोलीस आपसातच भांडतायत, क्राइम ब्रांचचा वांद्रे पोलिसांवर काय आरोप?
सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी करीना कपूरचा जबाब, ‘दागिने समोरच ठेवले पण…’
Saif Ali Khan Attack : अब्बूंवरील हल्ल्याने हादरला, सैफच्या लेकाने घेतला मोठा निर्णय
Saif Ali Khan : 5 हजार कोटीची संपत्ती, पण सैफ कंगाल झालेला, ही माहित नसलेली आयुष्याची दुसरी बाजू
उद्योगनगरीत उद्योजकांकडे खंडणी मागण्याच्या घटना; दोन वर्षांत खंडणीचे 11 गुन्हे दाखल