प्रकरण तापलं! ‘जर मुंडे, कराड यांच्याकडून…’, अंजली दमानियांचा लक्ष्मण हाकेंना थेट इशारा

प्रकरण तापलं! ‘जर मुंडे, कराड यांच्याकडून…’, अंजली दमानियांचा लक्ष्मण हाकेंना थेट इशारा

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात आंदोलन झालं, या आंदोलनामध्ये बोलताना त्यांनी आमदार सुरेश धस, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आता अंजली दमानिया यांनी लक्ष्मण हाके यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या दमानिया?

लक्ष्मण हाके यांनी वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. मुंडे आणि कराड यांना टार्गेट केलं जात असल्याचं ते म्हणाले? हे खूप चुकीचं आहे, हाके यांनी जे केलं ते गरजेचं होतं का असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. वाल्मिक कराड यांचा फोटो हाकेसोबत आहे, हे कठीण आहे. हा फोटो पाहून सगळे गार झाले आहेत. तपास दुसरीकडे चालला आहे, हे सगळं हॉरिबल आहे, असं दमानिया यांनी म्हटलं आहे. दरम्यान कराड यांच्यासोबतच्या फोटवर हाकेंकडून स्पष्टीकरण देखील देण्यात आलं होतं, त्यावर देखील दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुमचे फोटो देखील त्यांच्यासोबत आहेत. तुम्ही त्यांना भेटला हे खरं आहे, तुमची आणि त्यांची तितकीच चांगली ओळख आहे, हे पण खर आहे, असंही दमानिया यांनी म्हटलं आहे.

दरम्यान एक विशिष्ट समाजाच्या अधिकाऱ्यांना टार्गेट करण्यात येतं असा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला होता, या आरोपांना देखील दमानिया यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ऊसतोड्याचा पोरगा अधिकारी होतो त्याचा मलाही अतिशय आनंद आहे.  ऊसतोड कामगारांच्या मुद्द्यावर मी खूप लढले आहे. मी कधीही कोणत्या समाजाच्या विरोधात बोलत नाही. तुम्हालाही माहीत नसेल मी कुठल्या समाजाची आहे ती,  मुंडे, कराड यांच्याकडून हे कृत्य घडलं असेल तर त्यांच्या विरोधात मी लढणारच मग ते कुठल्याही समाजाचे असो, असा इशारा यावेळी अंजली दमानिया यांच्याकडून देण्यात आला आहे. त्या मुंबईमध्ये बोलत होत्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Santosh Deshmukh Murder Case ; राज्यभर ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन, या मागण्यांसाठी सरपंच परिषद आक्रमक Santosh Deshmukh Murder Case ; राज्यभर ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन, या मागण्यांसाठी सरपंच परिषद आक्रमक
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभर ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन सुरू आहे. अखिल भारतीय सरपंच...
Uddhav Thackrey : महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे एकला चलो रे? शिवसैनिकांचा स्वबळाचा नारा, ‘तो’ अहवाल महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवणार
अखेर अल्लू अर्जुनने चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या मुलाची घेतली भेट; पहा व्हिडीओ
प्रत्युषाकडून काम्याने घेतली लाखोंची उधारी; लावलं दारूचं व्यसन, एक्स बॉयफ्रेंडचा दावा
आशा आहे की आजची रात्र आपली सुरक्षित जाईल, लॉस एंजेलिस आग प्रकरणी प्रियांका चोप्राची इंस्टापोस्ट चर्चेत
धर्मवीरांच्या नावाखाली स्वतःचे ब्रँडिंग; मिंधेंच्या बेगडी प्रेमाचा पर्दाफाश, आनंद दिघे यांचे स्मारक कागदावरच
Pune news – वैकुंठ स्मशानभूमीतून कुत्र्यांनी पळवले मृतदेहाचे तुकडे; पावाचे तुकडे आणि नारळ असल्याचा पालिकेचा दावा