Mumbai News – मस्ती करताना तोल गेला अन् तरुण 2 वर्षांच्या चिमुकलीवर पडला, मुलीचा मृ्त्यू
मुंबईच्या जुहू परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. कॉलेजमध्ये शिकणारा तरुण दोन वर्षांच्या मुलीवर पडल्यामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पीडित कुटुंबीयांनी मुलीच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणाचा आरोप करत जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 2 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे.
मिळेलेल्या माहितीनुसार, विधी अग्रहरी असे या मृत मुलीचे नाव असून हर्षद गौरव असे त्या आरोपीचे नाव आहे. विधीही तिच्या कुटुंबीयांच्या दुकानाजवळ खेळत असताना ही घटना घडली. आरोपी मुलगा हर्षद गौरव हा त्याच्या मित्रांसोबत मस्ती करत होता. यावेळी मुलीच्या आईने त्यांना इथे खेळू नका आणि दुसरीकडे जा असे ठणकाऊन सांगितले होते. पण त्या मुलांनी काही ऐकले नाही.
आरोपी हर्षद गौरव आणि त्याचा मित्र शाहनवाज अन्सारी मस्ती करत असताना हर्षदचा तोल जाऊन तो विधीच्या अंगावर पडला. त्यामुळे मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना घडताच तिच्या कुटुंबीयांनी तत्काळ मुलीला कूपर रुग्णालयात नेले. येथे दोन दिवस मुलीवर उपचार सुरू होते. पण तिसऱ्या दिवशी विधीचा मृत्यू झाला. यामुळे मुलीच्या आई वडिलांनी आरोपी हर्षद विरोधात जुहू पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List