महाबळेश्वरची प्रसिद्ध स्ट्रॉबेरी दापोलीत दाखल; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
थंडीच्या हंगामाची सुरुवात झाली की विशेषतः स्ट्रॉबेरी बाजारात येते. महाबळेश्वर येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरी दापोलीतील फळविक्रेते विक्रीसाठी आणत आहेत. यंदा दापोली बाजारपेठेत स्ट्रॉबेरी उशाराने दाखल झाली आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. सध्या आवक कमी असल्याने याला चांगली किंमत मिळत आहे. आवक वाढल्यावर दर आणखी खाली येतील, असे फळविक्रेत्यांनी सांगितले.
यावर्षी बाजारात स्वीट चार्ली, विंटर डाऊन, नाबिया या जातीची स्ट्रॉबेरी आली आहे. प्रती किलो 400 रुपये दराने याची विक्री होत आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस बाजारात स्ट्रॉबेरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. स्ट्रॉबेरीच्या कामरोझा जातीची आवक दोन आठवड्यानंतर होणार असल्याची माहिती फळ विक्रेत्यांनी दिली. ही स्ट्रॉबेरी इतर स्ट्रॉबेरीच्या जातीच्या तुलनेत आकाराने मोठी असून, चवीलाही मधूर असते. त्यामुळे तिला अधिक मागणी असते असेही फळविक्रेत्यांनी सांगितले. स्ट्रॉबेरीची आवक वाढण्यास सुरुवात झाल्यांनतर हे दर आणखी खाली येण्यास सुरुवात होईल. स्ट्रॉबेरीचे उत्पादन होणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणीमधून दापोली बाजारपेठेत स्ट्रॉबेरी येते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List