Beed Murder : विष्णू चाटेला मुख्य आरोपी करायचं आणि प्रकरण थांबवायचं असा प्लान, राष्ट्रवादीच्या नेत्याने केला आरोप
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला महिना होत आला तरी या प्रकरणात अनेक घडामोडी सुरु आहेत. या संदर्भात राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आता या प्रकरणात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात सनसनाटी आरोप केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्ये प्रकरणात नेमलेल्या एसआयटीत आरोपी वाल्मिक कराड याच्या जवळचे पोलीस अधिकारी असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. या पोलिस अधिकाऱ्या सरकारने दूर केल्याने जितेंद्र आव्हाड यांनी सरकारचे आभार मानले आहेत. मात्र मित्र आहेत म्हणून जर अधिकाऱ्याला बाहेर काढले जाते तर जवळचे असलेल्या धनंजय मुंडे यांना बाहेर का काढले जात नाही असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
धनंजय मुंडेंना बाहेर का काढलं जात नाही….
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात प्रमुख आरोपी वाल्मिक कराड सीआयडी पुणे यांना शरण आला होता. यानंतर या प्रकरणात सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक झाली आहे. याता या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी तपास सुरु असेपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. आज मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिकीची मित्र असलेले पोलिस अधिकारी एसआयटीत आहेत, त्यामुळे त्यांना बाहेर काढण्याची मागणी आव्हाड यांनी केली होती. यानंतर या अधिकाऱ्याला एसआयटीतून बाहेर काढले आहे.या बद्दल जितेंद्र आव्हाड यांनी आभार मानले आहेत. मात्र, वाल्मिक कराडच्या जवळचे असलेल्या अधिकाऱ्यांना बाहेर केले आहे. मग जवळचे असलेल्या धनंजय मुंडेंना बाहेर का काढलं जात नाही असा सवाल आव्हाड यांनी केला आहे.
नशीब आण्णाला घेऊन ट्रकने गेले नाहीत
ज्या गाडीतून वाल्मिकी पुण्यात पाषाणपूर येथील सीआयडीच्या कार्यालयात शरण आला त्या गाडीचा नंबर २२३१ आहे. त्या गाडीच्या मालकाचे नाव शिवलिंग मोराळे आहे.मोराळे हा मस्साजोगला उपस्थित होता. मोराळे याच्या याच गाडीचं अनावरण हे मंत्री धनंजय मुंडे यांनी केले होते. तो मोराळे सांगतोय की आण्णा छोट्या गाडीत होते, मग मी मोठ्या गाडीत घेतलं. नशीब आण्णाला घेऊन ट्रकने गेले नाहीत अशी मिश्कील टीपण्णी यावेळी आव्हाड यांनी केली.धनंजय मुंडे अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. याबद्दल विचारले असता ‘काका मला वाचवा’ असे सांगायला गेले असतील असेही जितेंद्र आव्हाड यांनी मिश्कीलपणे सांगितले.
छगन भुजबळ यांनी या प्रकरणात मुंडे यांची बाजू घेतली आहे. त्याबद्दल विचारले असता ते पुढे म्हणाले की भुजबळ यांच्यावर दबाव असू शकतो, पण महाराष्ट्राचं मत हे छगन भुजबळ यांच्या विरोधात आहे. कोण हा वाल्मिक कराड ज्याच्याकडे काय एवढं घबाड आहे, ज्यामुळे त्याला वाचवलं जातंय. संतोष देशमुख यांच्या हत्येला आता एक महिना होईल. पण त्या घटनेच्या तपासात काय प्रगती आहे? मुख्यमंत्र्यांनी राजकारण बंद करून बीडच्या घटनेत योग्य ती कार्यवाही करावी. विष्णू चाटेला मुख्य आरोपी करायचे आणि प्रकरण थांबवायचं असं यांचं सुरु आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
त्याशिवाय मी शांत बसणार नाही
दिल्लीत प्रत्येक पाहिल्या पानावर ही बातमी येत आहे. महाराष्ट्राची बदनामी होत आहे. सरकार वाल्मिक कराडला वाचवणार आहे.त्याच्याकडे असं कुठलं धन आहे. ज्याला सरकार पण घाबरत आहे. मराठा आणि वंजारी असा वाद त्यात काहीही नाही. आपल्याला सोमनाथ सूर्यवंशी आठवतच नाही. जर कस्टडीमध्ये तो मारला गेला असेल तर तो एक खून आहे. त्याचे आरोपी कोण आहेत, हे माहिती काढली पाहिजे. समाजात जातीवाद अजूनही रुतलेला आहे. सोमनाथ सूर्यवंशी देखील एका आईचा मुलगा होता. फुले- शाहू -आंबेडकरी विचारांचा तो अभ्यास करणारा होता. एक दलित मुलगा मेला आहे. संवेदनशीलता नाही का? मी हा मुद्दा सोडणार नाही हे लक्षात ठेवा… सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांचं भूत या सरकारच्या मानेवर बसवणार त्याशिवाय मी शांत बसणार नाही. तुम्हाला सर्वांना पुण्यातील अजित दादांचे भाषण आठवतंय का? मी मोक्का लावलेल्या आरोपीला सोडवलंय…असे ते त्या भाषणात बोलले हेाते. मग हा काय तर त्यांच्या डाव्या हाताचा मळ असं वाटतंय असेही आव्हाड यावेळी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List