मुंडेंनी राजीनामा दिला नाही, तर लोक त्यांना खेचून बाहेर काढतील, अंजली दमानिया यांचा संताप

मुंडेंनी राजीनामा दिला नाही, तर लोक त्यांना खेचून बाहेर काढतील, अंजली दमानिया यांचा संताप

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आतापर्यंच वाल्मिक कराड याच्यासह आठ आरोपींना अटक झाली आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे दिला आहे. तर बीडचे पोलिस देखील तपास करीत आहेत. या प्रकरणातील सूत्रधार म्हटले जाणारे वाल्मिक कराड हे २२ दिवसांनी सीआयडीला शरण आले. तर मारेकऱ्यांना पुणे आणि कल्याण येथून पकडण्यात आले आहे. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हटले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या चौकशीपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्री पदावरुन दूर व्हावे अशी मागणी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी काल राज्यपालांना भेटून केली आहे. या प्रकरणात बीड येथे तळ ठोकून असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना समाजमाध्यमांवर ट्रोलींग होत असून त्यांना जीवेमारण्याच्या धमक्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी काल सायंकाळी भेट घेतली आहे.

संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या बीड जिल्ह्यात मुक्काम ठोकून आहेत. त्यांना धमक्या आल्यानंतर काल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आज प्रसारमाध्यमांजवळ बोलताना अंजली दमानिया यानी सांगितले की मी लेखी स्वरुपात तक्रार दिली नव्हती. आपण केवळ एसपीसोबत फोनवर बोलून सगळे पुरावे पाठवले होते. माझा फोन नंबर सोशल मीडिया वर व्हायरल करून माझे फोटो अश्लील बनवून समाज माध्यमावर टाकण्यात आले आहेत. पोलिसांनी सर्व पुरावे सायबर सेलकडे देण्याचे सांगितले होते. त्यानुसार सगळ्यांच्या नंबर सह सगळे पुरावे घेत रितसर तक्रार दाखल करायला या ठिकाणी आपण आले असल्याचे दमानिया यांनी सांगितले.

माझ्या 10 मागण्या आहेत

काल सायंकाळी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 45 मिनिटं आमची चर्चा झाली. बीडची गंभीर परिस्थिती आपण त्यांना सांगितली. देशमुख यांच्या हत्येपाठचं खरं कारण काय हे आपण सांगितले. कोणी विरोधात उभे राहिले तर संतोष देशमुख सारखी तुमची गत होईल, ही दहशत जी निर्माण करत आहेत. ती दहशत मोडून काढायला हवी यासाठी काय करायला हवं याची पूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या.

माझ्या 10 मागण्या आहेत, त्या सगळ्या मागण्यांवर मुख्यमंत्री कारवाई करतील असे आश्वासन त्यांनी मला दिले आहे. एसआयटी बरखास्त करणे, बीडच्या बाहेरच्या लोकांना त्या ठिकाणी आणून ती चौकशी करणे,ही चौकशी ऑन कॅमेरा व्हायला हवी, याप्रमाणे इतर मागण्या त्यांच्याकडे केल्या आहेत असेही दमानिया यांनी सांगितले.

धनंजय मुंडे राजीनामा

सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांनी स्वतः सांगितलं होतं की, मी आणि विजय पांढरे यांनी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी हे केले होते. आज ते धनंजय मुंडे बाबत हेच का बोलत नाहीत याचे त्यांनी उत्तर द्यावं असे अंजली दमानिया यांनी सांगितले.

धनंजय मुंडे मंत्रालयात म्हणाले की ‘आपण राजीनामा दिला नाही आणि देणार नाही’ अशी जी भूमिका त्यांनी मांडली आहे. अशी भूमिका कुठलाही सज्जन व्यक्ती असता तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असता आणि निष्पक्ष चौकशीसाठी तयार झाला असता.मी राजीनामा मी देतो असं त्यांनी म्हणाला हवं होतं. जणाची नाही तर मनाची तरी लाज हवी, कसली लाज नसल्यामुळे ते मंत्रिपद सोडायला तयार नाहीत. यांनी पदाचा राजीनामा दिला नाही तर लोकच त्यांना खेचून बाहेर काढतील असेही दमानिया यावेळी म्हणाल्या.

परमेश्वरच रक्षण करेल…

सुरक्षेची मागणी कधी मी केली नाही. मात्र या घटनेत काल रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी फोन करून वाल्मीक कराडचा कार्यकर्ता आहे असे सांगत मला धमकावले गेले.
यांची दहशत खूप मोठ्या प्रमाणातआहे, मात्र परमेश्वर आहे आणि तो आमची सुरक्षा करेल अशी मला खात्री आहे असेही दमानिया यावेळी म्हणाल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“दुश्मनी जमकर करो, लेकिन ऐहसास रहे…” पुण्यात उभारलेल्या फ्लेक्समध्ये भाजपा कार्यकर्त्यांचे पक्षालाच शालजोडे “दुश्मनी जमकर करो, लेकिन ऐहसास रहे…” पुण्यात उभारलेल्या फ्लेक्समध्ये भाजपा कार्यकर्त्यांचे पक्षालाच शालजोडे
एकीकडे विधानसभा निवडणकीत पराभव झाल्याने महाविकास आघाडीचा भ्रमनिरास झाला आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक नुकसान झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला...
ठाणे स्थानकात उभा राहणार ११ मजली टॉवर, RLDA चे टेंडर, पाहा काय आहेत सुविधा
“तू माझा नवरा असो किंवा गोंविदा, मी चमचागिरी करणार नाही”, सुनिता अहुजा स्पष्टच बोलली
रंगकाम करायला आला अन्…, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी चोरी; पार्टीत उडवले चोरीचे पैसे
‘कधी कधी बाहेर पडावं..’; अचानक मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत
अभिनेता अजित कुमारचा दुबईत भीषण अपघात; कारचा चक्काचूर, व्हिडीओ व्हायरल
बाप-लेकीला बाजूला ठेवा, तुम्ही इकडे या! अजित पवार गटाच्या ऑफरवर जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले