4,957 कोटींचा कर्ज घोटाळा; ईडीने आवळला फास, मुंबईसह दिल्लीत 14 ठिकाणी छापे
4,957 कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणात सक्त वसुली संचलनालयाने (ED) कारवाईचा फास आवळला. ईडीने मुंबईसह दिल्लीतील 14 ठिकाणावर छापेमारी केली. कर्ज घोटाळ्या प्रकरणात ED ने धडक कारवाई केली. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. ईडीने शुक्रवारी 5 कोटी 40 लाखांची मालमत्ता गोठवली.
प्रतिभा इंडस्ट्रीज रडारवर
बँक फसवणूक प्रकरणात मे. प्रतिभा इंडस्ट्रीज लिमिटेड आणि इतरांविरुद्ध ही शोध मोहीम राबवण्यात आली. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) प्रतिभा इंडस्ट्रीज, अजित कुलकर्णी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ईडी प्रकरणात तपास करत आहे. बँक समूहाची 4,957 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणात मुंबई आणि दिल्लीत 14 ठिकाणी ईडीने छापे टाकले. बँक ऑफ बडोदाने सीबीआयकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत बँक ठेवी, म्यच्युअल फंड अशी पाच कोटी 40 लाख रुपयांची मालमत्ता गोठवण्यात आली आहे. सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) मुंबई आणि दिल्लीतील 14 ठिकाणी शुक्रवारी छापे टाकले.
काय आहेत आरोप?
प्रतिभा इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांवर प्रकरणात फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. संचालकांनी कट रचून बँकांचे नुकसान केले. गैरव्यवहाराची रक्कम बनावट व्यवहारांमार्फत इतरत्र वळवली. त्याआधारे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मे. प्रतिभा इंडस्ट्रीज लिमिटेड, अजित कुलकर्णी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या मालमत्तांच्या खरेदीबाबत कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करत आहे.
प्रतिभा उद्योगचे बँक खाते NPA
प्रतिभा उद्योग समूहाचे खाते 31 डिसेंबर 2017 रोजी NPA म्हणून घोषीत करण्यात आले. त्यानंतर या समूहाने फसवणूक केल्याचा आरोप बँकांनी केला होता. तर बँक ऑफ बडोदाने सीबीआयकडे दाद मागितली होती. संबंधितांविरोधात कारवाईची मागणी केली होती. सीबीआयने याप्रकरणात लक्ष घातल्यानंतर आता ईडीने बँक फसवणूक प्रकरणात मे. प्रतिभा इंडस्ट्रीज लिमिटेड आणि इतरांविरुद्ध शुक्रवारी धडक कारवाई केली. अजून ही शोध मोहीम सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List