‘ऑल वुई इमॅजिन ऍज लाईट’ला ‘बाफ्टा’चे नामांकन
दिग्दर्शक पायल कपाडियाच्या ‘ऑल वुई इमॅजिन ऍज लाईट’ हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. विदेशातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. काही दिवसांपूर्वी गोल्डन ग्लोब ऍवॉर्डसाठी चित्रपटाला नामांकन मिळाले होते. त्यानंतर आता चित्रपटाने आणखी मोठी झेप घेतली आहे. ‘ऑल वुई इमॅजिन ऍज लाईट’ला ‘बाफ्टा’ ऍवॉर्डसाठी नामांकन मिळाले. तेही एक नव्हे तर तीन श्रेणींमध्ये. शुक्रवारी ‘बाफ्टा’ने 25 चित्रपटांची यादी जाहीर केली. त्यामध्ये या चित्रपटाचा समावेश आहे.
‘ऑल वुई इमॅजिन ऍज लाईट’ला बेस्ट डायरेक्टर, बेस्ट ओरिजनल क्रीन प्ले आणि बेस्ट फिल्म नॉट इन इंग्लिश यासाठी नामांकित केले आहे.
अभिनेता देव पटेल याला मंकी मॅन चित्रपटासाठी बेस्ट लीड ऍक्टर म्हणून त्याला नामांकन मिळालंय. याशिवाय हिंदी चित्रपट संतोषलादेखील नामांकन मिळाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List