थंडीच्या दिवसात छातीत कफ झाला? ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा
हिवाळा सुरु झाला की अनेकांना या दिवसांमध्ये हंगामी आजारपण होत असतात. अश्यातच थंडीत सर्वात जास्त समस्या ही कफ होण्याची होत असते. लहान मुलांपासून ते वृद्धांना या समस्यांना सामोरे जावे लागते. तर काहीजण असे ही आहेत ज्यांना थंडीत थंड पदार्थ खाल्याने सुद्धा त्यांना कफ लगेच होतात. तर कफामुळे पोट नीट साफ होत नाही आणि यामुळे दिवसभर पोटात दुखणे, मळमळ सारखं वाटणे अश्या समस्या उद्भवू लागतात. ज्यामुळे दिवसभरात आपल्या कामात लक्ष लागत नाही.
हिवाळ्यात कफ समस्या होण्याची सामान्य
कफामुळे आतड्यात घाण जमा होते आणि पचनसंस्थेवर याचा परिणाम होत असतो. त्यामुळे ही समस्या कायम राहिल्यास स्थिती गंभीर देखील होऊ शकते. यामुळे मूळव्याधाचा धोकाही वाढतो. हिवाळ्यात कफ समस्या होण्याची आणखीनच वाढते, कारण या दिवसात आपण तळलेले आणि मसालेदार पदार्थांचे सेवन जास्त करतो. तर दुसरीकडे थंडीच्या दिवसात पाणी कमी प्रमाणात पित असतो म्हणून या दिवसात ज्यांना आधीच कफ आहे त्या लोकांची समस्या वाढते.
थंडीत कफ होणे ही सामान्य समस्यांपैकी एक आहे, ज्याचा कधीकधी अनेकांना खूप त्रास होत असतो, परंतु काही लोकांना हिवाळा असो वा नसो कफाची समस्या कायम असते. यासाठी तेलकट आणि मसालेदार असलेले अन्न कमी करण्याबरोबरच चांगल्या प्रमाणात पाणी प्यावे आणि आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. अशातच या समस्येपासून तुम्हाला या काही घरगुती टिप्स कफ न होण्यापासून आराम देऊ शकतात चला तर मग जाणून घेऊयात.
कफाची समस्या दूर करण्यासाठी उपाय प्रभावी
स्वयंपाकघरात असलेल्या मसाल्यांमध्ये बडीशेप पचनासाठी खूप फायदेशीर मानली जाते. जेवण झाल्यानंतर अर्धा चमचा बडीशेप चावून खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होण्यास मदत होते. तसेच कफापासून मुक्ती मिळवण्यासाठी दररोज सकाळी बडीशेपचे पाणी प्यावे. तसेच ओवा आणि जिरे समप्रमाणात घेऊन त्यात अर्ध्या प्रमाणात मेथीदाणे घ्या आणि चांगले भाजून घ्यावेत. यात थोडे काळे मीठ सुद्धा मिक्स करा. सर्व साहित्य बारीक करून पावडर तयार करून हवाबंद डब्यात साठवून ठेवा. हे मिश्रण रोज अर्धा चमचा कोमट पाण्याबरोबर घेतल्याने त्याचा परिणाम तुम्हाला काही दिवसांतच दिसू लागेल.
तीव्र कफासाठी घ्या त्रिफळा चूर्ण
कफाची समस्या कायम राहिल्यास त्यापासून आराम मिळण्यासाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे चूर्ण म्हणजे त्रिफळाचे चूर्ण याचे सेवन करा. हे तीन आयुर्वेदिक फळांची पावडर आहे जे तीव्र कफाची समस्या दूर करण्यासाठी देखील प्रभावी मानले जाते. हे चूर्ण रोज कोमट पाण्यासोबत घेतल्यास लवकर आराम मिळतो. यासोबतच त्रिफळा चूर्णाचे इतरही अनेक फायदे आहेत. ज्याने तुम्ही तंदुरुस्त राहता.
पपई खाणे फायदेशीर
कफापासून सुटका मिळवण्यासाठी पिकलेल्या पपईचा आहारात समावेश करा. रोज थोडीशी पपई खाल्ल्याने अनेक पोषक तत्वे तर मिळतातच, शिवाय पपई ल्यूब्रिकेंट म्हणूनही काम करते, ज्यामुळे कफापासून सुटका होण्यास मदत होते.
अशा प्रकारे प्या दूध
रात्री आठ ते दहा मनुके पाण्यात भिजवून सकाळी त्यातील बिया काढून टाका. आता एका भांड्यात दूध घेऊन त्यात मनुके घालून दूध उकळून घ्या. हे दूध कोमट झाल्यावर प्या. रोज अशा प्रकारे दूध प्यायल्याने कफाची समस्या दूर होते.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List