मुंबई मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर; दैनिक ‘सामना’चे मंगेश मोरे यांना आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार घनःश्याम भडेकर यांना,जयहिंद प्रकाशन पुरस्कार
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार दैनिक ‘सामना’चे वरिष्ठ वार्ताहर मंगेश मोरे यांना जाहीर झाला आहे. बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत, स्तंभ व लिखाणासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 6 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता पत्रकार भवन, आझाद मैदान येथे ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी 6 जानेवारी रोजी विविध पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारांची घोषणा बुधवारी करण्यात आली. पत्रकारितेला उपयुक्त ठरणाऱ्या विषयावरील लेखनासंबंधी उत्कृष्ट पुस्तकासाठी दिला जाणारा जयहिंद प्रकाशन पुरस्कार घनःश्याम भडेकर यांना तर कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घरदुरुस्ती व दलितोद्धार या विषयांवरील पत्रकारितेसाठी दिला जाणारा कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार सचिन लुंगसे यांना दिला जाणार आहे. ललित लेखनासाठी दिला जाणारा विद्याधर गोखले पुरस्कार विनोद राऊत यांना तर उत्कृष्ट राजकीय बातम्या व राजकीय वृत्तांताबद्दल दिला जाणारा रमेश भोगटे पुरस्कार पांडुरंग म्हस्के यांना प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List