जोगेश्वरी आंबोली फाटक रेल्वे हद्दीतील झोपडीधारकांचे तातडीने पुनर्वसन करा; शिवसेनेची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

जोगेश्वरी आंबोली फाटक रेल्वे हद्दीतील झोपडीधारकांचे तातडीने पुनर्वसन करा; शिवसेनेची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

जोगेश्वरी पूर्व आंबोली फाटक येथील रेल्वे हद्दीतील झोपडीधारकांना रेल्वे प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली आहे. यामुळे येथे मागील कित्येक वर्षांपासून राहणारे नागरिक भयभीत झाले आहेत. याची गंभीर दखल घेत शिवसेनेचे स्थानिक आमदार अनंत (बाळा) नर यांनी पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यावस्थापकांची भेट घेऊन रेल्वे हद्दीतील झोपडीधारकांचे तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी केली.

पश्चिम रेल्वेकडून रेल्वे मार्गिका विस्तारीकरणाचे काम सुरू असून नजीकच्या काळात नवीन उपक्रमाचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे रुळाच्या जवळ असलेल्या तसेच रेल्वे हद्दीतील झोपडय़ा हटविण्यात येणार आहेत. जोगेश्वरी (पू.) सोशल वेल्फेअर इंदिरानगर, आंबोली फाटक येथील झोपडीधारकांना यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र हे झोपडीधारक पुनर्वसनास पात्र असतानाही त्यांच योग्य ते पुनर्वसन करण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. गेली कित्येक वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या झोपडीधारकांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी आमदार बाळा नर यांनी केली आहे.

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळा नर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पश्चिम रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेतली. यावेळी शिवसेना उपविभागप्रमुख पैलासनाथ पाठक, जयवंत लाड, शाखाप्रमुख मंदार मोरे, उपशाखाप्रमुख केशव चव्हाण, शाखा समन्वयक विशाल येरागी, विजय पाचरेकर, राष्ट्रवादीचे सचिन लोंढे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व अंबोली फाटक येथील रहिवासी उपस्थित होते.

आंबोली फाटक येथील 47 झोपडीधारकांचे 2000 साली मानखुर्द येथे पुनर्वसन करण्यात आले. 2013 साली 37 झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. उर्वरित झोपडीधारकांचे पुनर्वसन न झाल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याकडे बाळा नर यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी ! ठाणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यातील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण मोठी बातमी ! ठाणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यातील कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण
ठाणे शहरातील पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शासकीय निवासस्थानी बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. बंगल्याच्या आवारात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची...
IIT मुंबईतून इंजीनियरिंग, महाकुंभ 2025 मध्ये चर्चेतील साधू…कोट्यवधींचे पॅकेज सोडून का बनले संन्याशी?
सैफवर हल्ला करणारा आरोपी मुंबईच्या ‘या’ भागात; सर्च ऑपरेशन सुरू
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटली, मुंबई पोलिसांनी दिल्या तीन महत्त्वाच्या अपडेट
सहा वार, मणक्यात घुसला चाकूचा तुकडा.. सैफवरील शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांची माहिती
Saif Ali Khan Attack : ‘फक्त खान आडनाव आहे म्हणून…’, योगेश कदम यांचं आव्हाडांना सडेतोड प्रत्युत्तर
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर मध्यरात्री चाकू हल्ला, नक्की काय घडलं? 10 महत्त्वाचे मुद्दे