Breaking News – वाल्मीक कराड अखेर पोलिसांना शरण, सीआयडीच्या कार्यालयात आत्मसमर्पण

Breaking News – वाल्मीक कराड अखेर पोलिसांना शरण, सीआयडीच्या कार्यालयात आत्मसमर्पण

बीडमधील मस्साजोग गावचे संरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्या प्रकरणी तसेच पवनचक्की खंडणी प्रकरणी फरार वाल्मीक कराड मंगळवारी सकाळी पोलिसांना शरण आला. पाषाण येथील सीआयडीच्या कार्यालयात त्याने आत्मसमर्पण केले. मागील काही दिवसांपासून सीआयडीची  13 वेगवेगळी पथके त्याच्या मागावर होती.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह चार फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची नऊ पथके आणि 150 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. देशभर शोध सुरू असल्याचा दावा केला जात आहे. परंतु 22 दिवस उलटूनही हे आरोपी सापडलेले नाहीत. सरपंच हत्या प्रकरणात सुदर्शन घुले यांच्यासह तिघेजण फरार आहेत. तर दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड मोकाट होता. त्याच्या शोधासाठी सीआयडीचे पथक धावपळ करत होते. मात्र, कराड सापडला नाही. अखेर मंगळवारी सकाळी कराड हा स्वतः पोलिसांना शरण आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ईव्हीएमचा गोलमाल; जानकर देणार राजीनामा, बच्चू कडू यांच्यासोबत 23 जानेवारीला मुख्य निवडणूक आयुक्तांची घेणार भेट ईव्हीएमचा गोलमाल; जानकर देणार राजीनामा, बच्चू कडू यांच्यासोबत 23 जानेवारीला मुख्य निवडणूक आयुक्तांची घेणार भेट
विधानसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’मध्ये मोठा गोलमाल करून राज्यात महायुती सत्तेवर आली. यावरून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम...
पक्षात आता एकाधिकारशाही ! ‘अजितपर्व’ नावावरू छगन भुजबळांनी डागली तोफ
मुंबई-पुणे टॅक्सी स्टॅण्ड वाद हायकोर्टात, भूमिका स्पष्ट करा; न्यायालयाचे आदेश
मागे वळून पाहताना – वन वुमन इंडस्ट्री
किस्से आणि बरंच काही – कामापुरता मामा…
प्लेलिस्ट – गाणी असली-नकली
जागर – वणव्याने हादरली महासत्ता