मलिकांविरोधातील तपास चार आठवड्यांत पूर्ण करू, हायकोर्टात पोलिसांची हमी
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते नवाब मलिक यांच्या विरोधात आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी नोंदवलेल्या गुह्याचा तपास चार आठवडयात पूर्ण करु, अशी हमी मुंबई पोलिसांनी गुरुवारी उच्च न्यायालयात दिली.
सरकारी अधिकाऱ्याबाबत चुकीची माहिती देणे व मागास वर्गीयाची नाहक बदनामी करणे, असे आरोपही मलिक यांच्यावर ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठाला दिली. हा तपास योग्य प्रकारे करा, असे पोलिसांना सांगत न्यायालयाने ही सुनावणी 16 जानेवारी 2025 पर्यंत तहकूब केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List