संविधानाची विटंबना करणाऱ्यांना कठोर शासन करा – नाना पटोले.

संविधानाची विटंबना करणाऱ्यांना कठोर शासन करा – नाना पटोले.

परभणीत भारतीय राज्यघटनेची विटंबना करण्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. हा प्रकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर व संविधानाला मानणा-या कोट्यवधी लोकांचा घोर अपमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे, असा संतप्त सवाल करून संविधानाची विटंबना करणा-यांच्या मुसक्या आवळून त्यांना कठोर शासन करा, असे महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

परभणीतील घटनेवर प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रात संविधानाची विटंबना करणाचा प्रकार चिंतानजक व महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालण्यास लावणारा आहे. अशा विकृती शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजेच पण परभणीत आगडोंब उसळत असताना राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र मलईदार खाती व मंत्रीपदे वाटून घेण्यात व्यस्त आहेत. या सरकारला राज्याचे काही देणेघेणे नाही. संविधान न माननाऱ्या विचाराचे लोक सत्तेत आहेत त्यामुळे असे प्रकार होत आहेत.

परभणीत संविधानाची विटंबना झाल्यानंतर शहरात पोलीसांनी बेडकरी अनुयायांना अमानुष मारहाण केली, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या, संचारबंदी लावली, इंटरनेट, एसटी सेवा बंद केली. पोलीस व प्रशासन परभणीतील परिस्थिती व्यवस्थित हाताळू शकले नाहीत. आंबेडकरी अनुयायांना केलेल्या मारहणाची चौकशी करून जिल्हा पोलीस अधिक्षक यांना तात्काळ निलंबत करावे अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. परभणीतील घटनेचा नागपूरच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारू पण अशा घटना महाराष्ट्रात होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. लोकांनी अफवांना बळी न पडता लोकशाही मार्गाने या घटनेचा निषेध करावा असे आवाहनही पटोले यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आई रवीना टंडनने डोळे दाखवताच अखेर लेकीला करावी लागली ही गोष्ट; व्हिडीओ व्हायरल आई रवीना टंडनने डोळे दाखवताच अखेर लेकीला करावी लागली ही गोष्ट; व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री रविना टंडनची मुलगी राशा थडानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यापूर्वीच ती पापाराझी आणि नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरतेय. गुरुवारी रात्री...
‘जम्मू की धड़कन’, 7 लाख फॉलोअर्स… एक होती सिमरन; घरच्यांचे रडून रडून हाल
“मी 100 इंजेक्शन्स घेतले, तो शेवटचा चान्स होता”; अभिनेत्रीने सांगितला प्रेग्नंसीचा वेदनादायी अनुभव
“आम्ही एकमेकांना शिव्या-शाप देतच असतो..”; गोविंदाच्या पत्नीकडून खुलासा
मनमोहन सिंग आज आपल्यामध्ये नाहीत, त्यामुळे ही अस्वस्थता…; शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्वत:ला कोडे मारून घेतले, अनवाणी चालण्याची शपथही घेतली; का केलं असं? वाचा सविस्तर…
ट्रम्प यांच्या शपथविधीआधी युनिव्हर्सिटीत हजर रहा! परदेशी विद्यार्थ्यांना लवकर परत येण्याचं आवाहन, नवे नियम लागू होण्याची भिती