इस्लाम धर्म स्वीकारण्याचा सल्ला देणाऱ्याला पवित्रा पुनियाचं सडेतोड उत्तर; म्हणाली “सनातन धर्म..”
‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री पवित्रा पुनिया गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात असताना ती अभिनेता एजाज खानच्या प्रेमात पडली. हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते. मात्र काही महिन्यांपूर्वीच त्यांचा ब्रेकअप झाला. एजाजने पवित्रावर धर्मांतरासाठी दबाव आणला, म्हणून तिने ब्रेकअप केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र धर्मांतर करणार नसल्याचं मी एजाजला रिलेशनशिपच्या सुरुवातीलाच स्पष्ट केलं होतं, असं पवित्राने स्पष्ट केलं. यानंतर सोशल मीडियावर एका युजरने पवित्राला कुराण वाचण्याचा आणि इस्लाम धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला. त्यावर पवित्राने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आलं आहे.
संबंधित युजरने पवित्राच्या मंदिरातील एक व्हिडीओवर कमेंट केलंय. ‘बहीण पवित्रा.. माझा तुला सल्ला आहे की तू मूर्तीपूजन बंद कर. आमचा भाऊ एजाज खानशी तुझं लग्न होऊ शकलं नाही, हे जाणून खूप वाईट वाटलं. जोपर्यंत तुझा धर्म बदलणार नाही, तोपर्यंत तो तुझ्याशी लग्न करू शकत नाही. इस्लाम धर्माचा हा नियमच आहे. त्यामुळे मी तुला आता इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी आमंत्रण देतोयो. बॉलिवूड सेलिब्रिटी आणि प्रत्येकाला माहितीये की इस्लाम हेच सत्य आहे. त्यांच्या घरात कुराणची आयातं आहेत. माझा तुला हाच सल्ला असेल की तू कुराण वाचणं सुरू कर. मी तुला भाषांतरित कुराणची लिंक पाठवली आहे. आमचा विश्वास अल्लाहवर आहे. त्यांनी माणुसकीचं मार्गदर्शन करण्यासाठी अंतिम पैगंबर मोहम्मद यांना पाठवलं होतं. इस्लाम हा या विश्वात सर्वांत जलद गतीने वाढणारा धर्म आहे. फक्त अमेरिकेतच दरवर्षी 25 हजार लोक इस्लामचा स्वीकार करतात. पाश्चिमात्य देशात 75 टक्के धर्मांतर केलेल्या महिला आहेत’, असं युजरने लिहिलंय.
युजरच्या या कमेंटवर पवित्राने सडेतोड उत्तर दिलंय. पवित्रा तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. “बेटा.. मला शिकवू नकोस. अन्यथा सनातन धर्म काय आहे हे चांगल्याप्रकारे समजावण्यासाठी माझ्याकडे खूप वेळ आहे”, अशा शब्दांत तिने युजरला सुनावलंय.
याआधी दिलेल्या मुलाखतीत पवित्रा धर्माबद्दल म्हणाली, “एजाजला मी खूप आधीच सांगितलं होतं की मी माझा धर्म कधीच बदलणार नाही. जी व्यक्ती स्वत:च्या धर्माची नसते, ती कोणाचीच नसते, असं मला वाटतं. दुसऱ्या व्यक्तीचा धर्म बदलण्याचा हक्क कोणालाच नाही. जो आपल्या धर्माशी प्रामाणिक नाही राहिला, तो तुमच्याशी कसा प्रामाणिक राहील? तुम्हाला लग्न करायचं असेल तर तरा, पण धर्म बदलण्यासाठी कोणाला काहीच म्हटलं नाही पाहिजे.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List