‘बेस्ट’ ड्रायव्हरची सरप्राइज ब्रिथ ऍनालायझर टेस्ट
कुर्ल्यातील बस दुर्घटनेत सात जणांचा बळी गेला असताना भाडेतत्त्वावरील बसच्या ड्रायव्हरकडून ऑनडय़ुटी दारू खरेदीचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रचंड संताप व्यक्त होत असल्याची गंभीर दखल बेस्ट प्रशासनाने घेतली असून आता भाडेतत्त्वावरील ड्रायव्हरची सरप्राइज ब्रिथ अॅनालायझर टेस्ट करण्यात येणार आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती ‘बेस्ट’ महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी दिली.
‘त्या’ चालकांचे निलंबन
गेल्या दोन दिवसांपासून बेस्टचे ड्रायव्हर ऑनडय़ुटी दारू खरेदी करत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने बेस्टवर प्रचंड टीका होत असल्यामुळे प्रशासनाने कठोर कारवाईचा निर्णय घेत संबंधित तीनही ड्रायव्हरचे निलंबन केले आहे. असे प्रकार पुन्हा आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही ड्रायव्हरना देण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List