मुंबई ते नागपूर एका चार्जमध्ये धावणार! Xiaomi ची नवीन इलेक्ट्रिक कार येतेय; जाणून घ्या रेंज आणि किंमत

मुंबई ते नागपूर एका चार्जमध्ये धावणार! Xiaomi ची नवीन इलेक्ट्रिक कार येतेय; जाणून घ्या रेंज आणि किंमत

सध्या फक्त आपल्याच देशात नाही तर जगभरात इलेक्ट्रिक कारवर लक्ष केंद्रित केले जात आहे. आता मोटारींमध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. Xiaomi ने आपली पहिली इलेक्ट्रिक SUV लॉन्च केली आहे. कंपनीच्या या कारचे नाव YU7 आहे. पण ही इलेक्ट्रिक कार सध्या चीनमध्ये सादर करण्यात आली असून ती पुढील वर्षी जुलै महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते. त्याचवेळी तिची किंमतही समोर येईल. नवीन Xiaomi YU7 इलेक्ट्रिक कारमध्ये काय खास आणि नवीन आहे, ते जाणून घेऊया…

हिंदुस्तानात कधी होणार लॉन्च होईल का?

नवीन Xiaomi YU7 चे डिझाईन अतिशय स्पोर्टी आहे. याची थेट स्पर्धा टेस्ला मॉडेल Y आणि BYD इलेक्ट्रिक कार्सशी असेल. चीनमध्ये ही कार टेस्ला मॉडेल Y ला मोठी स्पर्धा देऊ शकते. मात्र ही कार किती ॲडव्हान्स आहे, याबाबतची माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे. टेस्ला मॉडेल Y ला चिनी बाजारात खूप पसंती दिली जात आहे.

असं असलं तरी ही कार हिंदुस्तानात कधी लॉन्च होईल आणि त्याची किंमत किती असेल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Xiaomi ची सध्या हिंदुस्तानात इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची कोणतीही योजना नाही.

TOI च्या रिपोर्टनुसार, Xiaomi इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी म्हणाले की, कंपनी सर्वातआधी चीनच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करेल, त्यानंतरच तिचा जागतिक स्तरावर विस्तार केला जाईल.

ॲडव्हान्स फीचर्स, जबरदस्त रेंज

नवीन Xiaomi YU7 मध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. यात अत्याधुनिक डिझाइन केलेली व्हील्स देण्यात आली आहेत. ज्यामुळे कारचा लूक अधिक स्पोर्टी आणि स्टायलिश दिसतो. या नवीन SUV च्या मागील बाजूस SU7 प्रमाणे LED टेल लॅम्प बसवण्यात आले आहेत. यात हायटेक फीचर्स मिळणार आहेत. यात ड्युअल सेटअप मोटर आहे, जी 299 एचपी आणि 392 एचपी पॉवर जनरेत करते. दोन्ही मिळून 691hp पॉवर जनरेट करतात.

या कारचा कर्ब वजन 2,405 किलो आहे. या SUV ची लांबी 4,999mm, रुंदी 1,996mm आणि उंची 1,600mm आणि तिचा व्हीलबेस 3,000mm आहे. या SUV चा टॉप स्पीड 253kmph आहे.  या मॉडेलची किंमत 2.50 लाख ते 3.50 लाख युआन (रु. 29 लाख ते 41 लाख) दरम्यान असण्याचा अंदाज आहे. तर टेस्ला मॉडेल Y ची किंमत चीनमध्ये 249,900 युआन (अंदाजे 29 लाख रुपये) किंमत आहे.

Xiaomi YU7 सुमारे 5 मीटर लांब आहे आणि एक प्रीमियम सेडान आहे. तर टॉप-एंड प्रकारात ड्युअल मोटर सेटअप आहे. या कारमध्ये 101 kWh क्षमतेचा मोठा Qilin बॅटरी पॅक आहे. ही कार एका पूर्ण चार्जवर सुमारे 800 किमीची रेंज देऊ शकते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या हत्येसाठी शार्प शूटर्सला सुपारी? लातूरमध्येच गेम करण्याचा प्लान; ठाण्यातून दोन जण ताब्यात मोठी बातमी! शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या हत्येसाठी शार्प शूटर्सला सुपारी? लातूरमध्येच गेम करण्याचा प्लान; ठाण्यातून दोन जण ताब्यात
मोठी बातमी समोर येत आहे, या बातमीनं खळबळ उडाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे नेते आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा...
इस्लाम धर्म स्वीकारण्याचा सल्ला देणाऱ्याला पवित्रा पुनियाचं सडेतोड उत्तर; म्हणाली “सनातन धर्म..”
बॉक्स ऑफिसवर 25,000 कोटींचे कलेक्शन करणारा हा पहिलाच अभिनेता; सलमान,शाहरूखलाही मागे टाकलं
कायदा-सुव्यवस्थेशी तडजोड नाही..; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली कलाकारांची भेट
बद्धकोष्ठतेचे ‘हे’ गैरसमज दूर करा, उपाय जाणून घ्या
भाजपला 2244 कोटींची देणगी, ED ची धाड पडलेल्या कंपन्यांकडूनही निधी; निवडणूक आयोगाने उघड केली आकडेवारी
‘मी सिंगल आहे’, अर्जुन कपूरचं विधान, मलायका अरोराचा पलटवार, म्हणाली…