तरुणीने धाडस दाखवले आणि न्यायाधीश एसीबीच्या जाळ्यात अडकला

तरुणीने धाडस दाखवले आणि न्यायाधीश एसीबीच्या जाळ्यात अडकला

साताऱ्यात एका तरुणीने दाखवलेल्या धाडसामुळे चक्क न्यायाधीशच एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. जामीन मंजूर करण्यासाठी संशयित आरोपीकडून पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने जिल्हा सत्रन्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. आपल्यावर अन्याय झाला तर न्यायालयात दाद मिळेल अशी सर्वसामान्यांची धारणा असते, मात्र न्यायाधीशही लाच मागू लागले तर विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

न्यायाधीश धनंजय निकम, आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी, मुंबई) आणि अन्य एक व्यक्ती अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका 24 वर्षीय तरुणीने पुणे ‘एसीबी’ कार्यालयाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार ही कारवाई झाली आहे. तक्रारदार तरुणीच्या वडिलांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यांना अटकही करण्यात आली होती. तरुणीचे वडील सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी सातारा जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. हा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्याकडे प्रलंबित आहे. जामीन अर्ज मंजूर करण्यासाठी आनंद खरात आणि किशोर खरात यांनी न्यायाधीश निकम यांच्या सांगण्यावरून पाच लाख रुपयांची लाच मागितली. तरुणीने पुणे एसीबीकडे तक्रार दाखल केली. पुणे एसीबीच्या पथकाने 3 व 9 डिसेंबरला सातारा येथे जाऊन पंचासमक्ष पडताळणी केली. न्यायाधीश धनंजय निकम यांनी आनंद खरात आणि किशोर खरात यांच्याशी संगनमत करून त्यांच्यामार्फत पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे सातारा जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच असलेल्या एका हॉटेलमध्ये एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. न्यायाधीश निकम यांच्यासह चौघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपअधीक्षक अनिल कटके तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Lamborghini Car Fire : धड धड पेटली लेम्बोर्गिनी कार, गौतम सिंघानियाने शेअर केला Video, सुरक्षेवर ठेवले बोट Lamborghini Car Fire : धड धड पेटली लेम्बोर्गिनी कार, गौतम सिंघानियाने शेअर केला Video, सुरक्षेवर ठेवले बोट
मुंबईतील कोस्टल रोडवर एका धावत्या आलिशान कारला आग लागली. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला. ज्यामध्ये या कारला आग लागल्यानंतर...
IMD Weather Update : महाराष्ट्रावर मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट; पुढील 48 तास धोक्याचे, हवामान विभागाचा हायअलर्ट
धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ? महायुतीच्या दोन बड्या नेत्यांकडू सूचक वक्तव्य, नेमकं काय घडतंय?
प्रसिद्ध अभिनेता फोटोग्राफरच्या प्रेमात; प्रेमाची कबुली देत थेट लग्नाची मागणी
लग्नाची खूप भिती वाटते या अभिनेत्रीला; ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कधीच करणार नाही लग्न, नक्की कारण काय?
विद्यापीठातील मराठी भाषा भवनाची वापराआधीच दैना, शिवसेना, युवासेनेकडून पोलखोल
निवडणुकीआधी महिलांना पैसे वाटप? भाजप नेत्यांविरोधात ED कडे ‘आप’ने दाखल केली तक्रार