आयपीएल गुगलवर सर्वाधिक सर्च
कोणत्याही शब्दाची माहिती असेल किंवा त्यासंबंधी बातमी वाचायची असेल तर गुगलवर जाऊन सर्च करावे लागते. 2024 हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. परंतु या वर्षात देशात सर्वात जास्त कोणता शब्द गुगलवर सर्च केला आहे याची माहिती गुगलच्या ‘इयर इन सर्च’ रिपोर्टमधून समोर आली आहे. गुगलवर सर्वात जास्त आयपीएल हा शब्द सर्च करण्यात आला आहे. आयपीएल सर्च करताना युजर्संनी आवडती टीम, खेळाडू, लिलावाची माहिती सर्च केली. त्यापाठोपाठ टी-20 वर्ल्डकप, भारतीय जनता पार्टी, निवडणूक निकाल 2024, ऑलिम्पिक 2024, वाढती उष्णता, उद्योगपती रतन टाटा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, प्रो कबड्डी लीग आणि इंडियन सुपर लीग हे दहा शब्द गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आले. या टॉप 10 शब्दांमध्ये दोन राजकीय पक्ष वगळता बाकी सगळे शब्द हे स्पोर्टस्संबंधित आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List