‘संविधान धोक्यात नाही तर…’ , प्रकाश आंबेडकरांचा पुन्हा काँग्रेसवर हल्लाबोल

‘संविधान धोक्यात नाही तर…’ , प्रकाश आंबेडकरांचा पुन्हा काँग्रेसवर हल्लाबोल

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, त्यानंतर नव्या सरकारचा शपथविधी देखील झाला. मात्र विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधकांकडून आता ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे, यावरून आरोप -प्रत्यारोप सुरू असून या वादात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील उडी घेतली आहे. मारकडवाडीमधील ग्रामस्थांकडून बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र त्यांना परवानगी नाकारली, यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?  

ईव्हीएमविरोधात आम्ही आंदोलन सुरू केलं आहे. निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदानाच्या दिवशी सायंकाळी सहानंतर झालेल्या मतदानाचे डिटेल्स मागितले आहेत. आयोगाच्या उत्तराची वाट पाहात आहोत. मारकडवाडी सारखी परिस्थिती गावागावत आहे, गावागावत रोष आहे. मरकडवडी येथील गावकाऱ्यांचा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या निर्णयाला आडवीण्याचा सरकार किंवा पोलिसांना आधिकार नाही. सरकारने मारकडवाडी येथील ग्रामस्थांना अडविल्याने संशय बळवतो की यांनी गडबड केली आहे, असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी मारकडवाडी या गावातील मतदान थांबाविण्याचा आदेश दिला होता का? याबाबत एकनाथ शिंदे यांनी खुलासा करावा. वेळ मिळाला तर मी मारकडवाडीला जाणार आहे. मी अनेकदा म्हटलं की हे ईव्हीएम पूर्वी काँग्रेसकडून पाडण्यासाठी वापरलं जात होतं. आता हे भाजपकडून निवडणुका जिंकण्यासाठी वापरलं जात आहे. सर्वोच्च न्यायालायचे न्यायाधीश ईव्हीएमचा मुद्दा बघायला तयार नाहीत. राज्यात आलेलं बहुमत हे ईव्हीएमचं बहुमत आहे, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  संविधान खतरे में नाही तर काँग्रेस पक्ष खतरे में है. काँग्रेसने आम्हला बाहेर का ठेवलं? याचा पहिल्यांदा खुलासा करावा. आम्ही भाजप सोबत कधीही समजोता करणार नाही, हे आम्ही ठरवलं आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संध्या थिएटच्या चेंगराचेंगरीतील मृत महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुन अन् चित्रपट निर्मात्यांकडून 2 कोटींची मदत संध्या थिएटच्या चेंगराचेंगरीतील मृत महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुन अन् चित्रपट निर्मात्यांकडून 2 कोटींची मदत
संध्या थिएटच्या चेंगराचेंगरीतील दुर्घटनेमुळे अभिनेता अल्लू अर्जुन सध्या प्रचंड अडचणीत आहे. त्याच्यावरील आरोप आणि संकटे वाढतच चालले पाहायला मिळत आहे....
हिवाळ्यात रिकाम्या पोटी किती पाणी पिणे आवश्यक? जाणून घ्या तज्ञांकडून पाणी पिण्याची योग्य पद्धत
घरच्या घरी सोप्या पद्धतीनं बनवा मार्केटपेक्षा चविष्ट आणि हेल्दी टोमॅटो सॉस…रेसीपी नक्की वाचा
विठ्ठल मंदिराचा दरवाजा चांदीने झळाळणार, भक्ताकडून 30 किलो चांदी दान
पुण्यातील मुळा मुठा नदीत मृत माशांचा खच, चौकशी सुरू
“तळघर, आकर्षक विद्युत रोषणाई अन्…”, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण, आतापर्यंत किती कोटींचा खर्च?
VIDEO : “कल खेल में, हम हों न हों…” प्रकृतीत सुधारणा होताच विनोद कांबळी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर