भयंकर! रेल्वेमध्ये चढताना प्रवाशावर धारधार शस्त्राने हल्ला; हात धडावेगळा केला
रेल्वेमध्ये चढताना प्रवाशावर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तामिळनाडूतील संकरांकोविल रेल्वे स्थानक हादरून गेले आहे. या हल्ल्यामध्ये 24 वर्षीय सेल्वराज याचा डावा हातच धडावेगळा झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सेल्वराज हा वासुदेवनल्लूर येथील रहिवासी असून त्याला चेन्नईला जायचे होते. पोधिगई एक्सप्रेसने तो प्रवास करणार होता. यासाठी तो संकरांकोविल रेल्वे स्थानकावर पोहोचला होता. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून त्याने रेल्वे पकडण्याचा प्रयत्न केला. रेल्वेमध्ये चढत असतानाच त्याच्यावर एका व्यक्तीने धारधार शस्त्राने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला. या हल्ल्यामध्ये सेल्वराजच्या डोक्यावर, चेहऱ्यावर गंभीर जखमी झाले असून त्याचा डावा हात धडावेगळा झाला आहे.
हल्ल्यानंतर सेल्वराज रक्तबंबाळ अवस्थेत रेल्वे स्थानकावर पडून होता, त्याचवेळी आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सेल्वराजला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून 18 वर्षीय कन्नन याला अटक केली. या हल्ल्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.
दरम्यान, तामिळनाडूतील हिंदू कॉलेज रेल्वे स्थानकासह उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांवर अल्पवयीन मुलांनी हल्ले केल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. ‘इंडिया टुडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List