आपची दुसरी यादी जाहीर; 17 विद्यमान आमदारांना डच्चू, अवध ओझा मैदानात
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. अलीकडेच आपमध्ये प्रवेश केलेल्या अवध ओझा यांना उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या पारंपरिक (पटपडगंज) मतदारसंघातून मैदानात उतरवण्यात आले, तर सिसोदिया यांना जंगपुरा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. आपने दुसऱया यादीतून 17 विद्यमान आमदारांचे तिकीट कापले.3 उमेदवारांचे मतदारसंघ बदलले आहेत. 21 नोव्हेंबर रोजी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती.
फेब्रुवारी 2025 मध्ये राजधानी दिल्लीत विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक होणार आहे. सत्ताधारी आपने चौथ्यांदा दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने सर्वाधिक 62 जागांसह सरकार स्थापन केले, तर भाजपला अवघ्या 8 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List