एकाच कुटुंबातील चौघांचे हत्याकांड, आरोपीची फाशी हायकोर्टाकडून रद्द
पुण्यात 27 वर्षांपूर्वी एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केली. आरोपी भागवत काळेला पुणे सत्र न्यायालयाने फाशी सुनावली होती. त्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य सरकारने अपील केले होते. हे अपील उच्च न्यायालयाने फेटाळले. फाशी सुनावण्याइतपत सबळ पुरावेच नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. पुणे सत्र न्यायालयाने 14 डिसेंबर 2021 रोजी भागवतला फाशी सुनावली होती. ती फाशी उच्च न्यायालयाने रद्द केली आणि भागवतला तातडीने तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले. रमेश पाटील व पत्नी विजया व दोन मुलांची हत्या झाली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List