पावाने केले वडापाव खाणाऱ्यांचे वांदे, मुंबईकरांचे पोट भरणारा वडापाव महागला
वाढत्या महागाईचा फटाक आता सर्वसामान्यांचा झणझणीत वडापावाला देखील बसणार आहे. कारण वडापावसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या पावाचे दर वाढविण्याचा निर्णय बेकरी असोसिएशनने घेतलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांचे कमी पैशात पोट भरण्याची हमी देणारा वडापावर महागण्याची चिन्हे आहेत. बेसन, कांदे, लसूण, तेल यांचे वाढलेले दर देखील वडापावच्या वाढणाऱ्या किंमतींना कारणीभूत मानले जात आहेत.
मुंबईकरांसह सर्वांचे पोट भरणारा लाडका वडापाव महागण्याची चिन्हे आहेत. याला पावाची दरवाढ कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. मुंबईकरांची अडीअडचणीला पोट भरण्याची हमखास हमी देणारा वडापाव महागल्याने सर्वसामान्यांचे वांदे होणार आहेत. रस्त्यावर वडापावाच्या गाड्यांवर सहज मिळणारा मुंबईकरांचा आवडता वडापाव महागल्याने सर्वसामान्यांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
बेकरी असोसिएशनने पावाची दरवाढ केली आहे. त्याचा फटका वडापावाला देखील बसणार आहे. एका पावाच्या किंमतीत 37 पैशांची दरवाढ झालेली आहे. त्यामुळे आता आठ पावांच्या एका लादीत तीन रुपयांची दरवाढ झाली आहे. यापूर्वी बेसन, कांदे, बटाटे, लसूण, तेल महागल्यानंतर आता पावाची दरवाढ ही वडापावचे दर वाढवण्यासाठी निमित्त ठरली आहे.
वडापावाची किंमत का वाढविली ?
बदलापूर बेकरी असोसिएशनने पाव तयार करण्यासाठी लागणारे साहित्य महागल्याने आठ पावांच्या लादीत तीन रुपयांची दरवाढ केली आहे. त्यामुळे यापूर्वी 20 रुपयांना मिळणारी लादी आता 23 रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे एका पावाच्या किंमतीत 37 पैशांची दरवाढ झाली आहे. पण तरीही वडापावचे दर 1 ते 2 रुपयांनी वाढविले असल्याने नागरिक बुचकळ्यात सापडले आहेत. पण वडापावच्या दरवाढीला पावाची दरवाढ ही फक्त निमित्तमात्र ठरली असून यापूर्वी बेसन, कांदे, बटाटे, लसूण, तेल याच्या वाढलेल्या किंमती देखील वडापाव महागण्यास कारणीभूत ठरल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List