देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, बड्या अधिकाऱ्यांना सूचना, नेमका प्लॅन काय?

देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, बड्या अधिकाऱ्यांना सूचना, नेमका प्लॅन काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळात सरकारची दिशा काय असेल याबाबत स्पष्ट केले. पारदर्शकता, गतिशीलता आणि प्रामाणिकता यावर अधिक भर द्या, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. केंद्र सरकारचा पुरेपूर वापर राज्याच्या प्रगतीसाठी करून घ्या, अधिक समन्वय, पाठपुराव्याची व्यवस्था निर्माण करा. यासाठी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून स्वतंत्र कक्ष उभारा. वॉररूम आणखी कार्यक्षम करा. कोणते प्रकल्प त्यात असले पाहिजे, याची नव्याने रचना मुख्य सचिवांनी करावी. पहिली बैठक डिसेंबर अखेरीस व्हावी. एक वॉररूम पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आहेच, पण दुसरी वॉररूम आता केंद्र आणि राज्य सरकारच्या फ्लॅगशिप योजनांसाठी असेल. त्यातून सर्वसामान्य लोकांपर्यत लाभ गतीने पोहोचले पाहिजे, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली.

जनता दरबार, लोकशाही दिन कार्यक्रम वेगाने हाती घ्या. हे कार्यक्रम सुरू झालेच पाहिजे, ते तळागाळात नेले पाहिजे. आपले सरकार पोर्टल पुन्हा नव्याने पूर्ण क्षमतेने चालवा. पालक सचिवांनी आपल्या जिल्ह्यात प्रवास तत्काळ सुरू करावे. आपल्या अनुभवाचा फायदा त्या-त्या जिल्ह्यांना करून द्या, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी सचिवांना केल्या.

देवेंद्र फडणवीस यांनी काय-काय सूचना केल्या?

वेगवेगळ्या विभागाचे पोर्टल अपडेट करा. ते अधिक प्रभावी करा. त्यातून लोकांना शक्य तितक्या सेवा घरबसल्या लोकांना कशा मिळतील, यावर भर दिला पाहिजे. उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना मंत्रिमंडळ बैठकीत सन्मानित करण्यात येईल. सर्व संकेतस्थळ हे RTI फ्रेंडली करा. 26 जानेवारीपर्यंत यावर टार्गेट करा, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

‘इज ऑफ लिव्हिंग’वर सर्वाधिक भर द्या. सर्वाधिक लोक आपल्याकडे कशासाठी येतात आणि त्यांना त्या सेवा घरबसल्या कशा मिळतील, यावर भर द्या. 6/6 महिन्यांचे दोन टप्पे करून हे उद्दिष्ट गाठायचे आहे. यासाठी माजी अधिकाऱ्यांची समिती गठित करून एक अभ्यास अहवाल तयार करा, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे प्राधान्याने लक्ष द्या. त्यांचा थेट सचिवांशी संवाद आणि त्यातून त्यांच्या समस्यांचे निराकरण करा. नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तातडीने घेऊन त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पदस्थापना द्या. जेणेकरून त्यांना काम करणे सोपे होईल. महाराष्ट्र हे असिमित ताकदीचे राज्य. पण नंबर 1 वर आहोत, म्हणून थांबू नका. जुनी पुण्याई असली तरी नवी पुण्याई पुन्हा मिळवली पाहिजे. तंत्रज्ञानाचा महत्तम वापर करा. सर्व अडचणी दूर करा. 100 दिवसांचा कार्यक्रम प्रत्येक विभागाने सादर करावा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘आमच्याकडे मान-अपमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं’, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? ‘आमच्याकडे मान-अपमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं’, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
संगीत मानापमान या नाटकावर आधारित भव्य चित्रपट येत्या 10 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चिंग सोहळा आज मुंबईत...
अल्लू अर्जून विरोधात पोलिसांकडून आणखी एक नोटीस, उद्या सकाळी 11 वाजता हजर राहण्याचे आदेश
शिवसेनेचे मंत्री नाराज, समोर आलं मोठं कारण, शिंदेंच्या शिलेदारांनी बोलून दाखवली खंत
सर्वसामान्यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दाखवणारा अवलिया हरपला, प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री श्याम बेनेगल यांचं निधन
वसतिगृहाच्या छतावर आंघोळीसाठी चाललेल्या विद्यार्थ्याला वॉर्डनने ढकलले, मुलाचा मृत्यू; दोन शिक्षकांना अटक
मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही
मंत्री होताच गोगावले हवेत, नेटकऱ्यांचा निशाणा