Kurla Bus Accident : कुर्ल्यात भरधास बेस्ट बसने अनेकांना चिरडलं; 20 जण जखमी, 3 मृत्यू

Kurla Bus Accident : कुर्ल्यात भरधास बेस्ट बसने अनेकांना चिरडलं; 20 जण जखमी, 3 मृत्यू

कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव बेस्ट बसने रस्त्यावर चालणाऱ्या अनेक नागरिकांना चिरडले आहे. तसेच अनेक वाहनांनादेखील जोराची धडक दिली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापक पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष बघायला मिळतोय. नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. या घटनेतील जखमींना सायन आणि कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेने या घटनेतील जखमी आणि मृतकांची अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत 20 जण जखमी झाले आहेत. यापैकी 3 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतकांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

अपघातग्रस्त बेस्ट बसचा चालक हा मद्यधुंद होता, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दुसरीकडे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेस्ट बस रूट क्र.332 कुर्ला स्थानक येथून अंधेरीकडे जात असताना हा अपघात बुद्ध कॉलनी जवळील आंबेडकर नगर येथे झाला.

भरधाव बसने रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिली, अनेक पादचाऱ्यांना अक्षरश: चिरडलं. बेस्ट बसने अनेक रिक्षांना धडक दिली त्या रिक्षांमध्ये प्रवासीदेखील होते. अनेक वाहनांना आणि नागरिकांना उडवल्यानंतर ही बस पुढझे आंबेडकर नगरच्या कमानीत घुसली आणि तिथेच थांबली.

स्थानिकांनी सांगितला घटनेचा थरार, पाहा व्हिडीओ

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवसेनेचे मंत्री नाराज, समोर आलं मोठं कारण, शिंदेंच्या शिलेदारांनी बोलून दाखवली खंत शिवसेनेचे मंत्री नाराज, समोर आलं मोठं कारण, शिंदेंच्या शिलेदारांनी बोलून दाखवली खंत
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, तब्बल 231 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला तीन पक्ष...
सर्वसामान्यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर दाखवणारा अवलिया हरपला, प्रसिद्ध दिग्दर्शक पद्मश्री श्याम बेनेगल यांचं निधन
वसतिगृहाच्या छतावर आंघोळीसाठी चाललेल्या विद्यार्थ्याला वॉर्डनने ढकलले, मुलाचा मृत्यू; दोन शिक्षकांना अटक
मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही
मंत्री होताच गोगावले हवेत, नेटकऱ्यांचा निशाणा
वंदे भारतच रस्ता चुकली! सीएसएमटी -मडगाव प्रवास मात्र व्हाया कल्याण; वाचा नेमके काय झाले…
प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे दीर्घ आजाराने निधन, 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास