क्षयरोग कशामुळे होतो? अशी लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा अन्…

क्षयरोग कशामुळे होतो? अशी लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा अन्…

एक असा आजार ज्याचे उपचार तर आहेत पण तो कितीवेळात बरा होऊ शकतो याची काही शाश्वती नाही. असा आजार ज्याने बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागतो. तो आजार म्हणजे क्षयरोग. हा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे जो अनेकदा फुफ्फुसांना नुकसान पोहोचवतो. हा सर्वात मोठा संसर्गजन्य किलर मानला जातो.

काही वेळेला या आजारीची लागण झाली आहे हे समजायला वेळ लागतो आणि मग हा आजार बळावत जातो. पण जर आपल्याला या आजाराच्या लक्षणांची थोडी जरी कल्पना असेल किंवा माहिती असेल तर आपण सुरुवातीपासून याची काळजी घेत लगेचच उपचार घेण्यास सुरुवात केली तर कदाचित हा आजार बरा होण्याची शक्यता असते.

या आजाराची लक्षणे काय असतात?

रक्तासह सतत खोकला किंवा कोरडा खोकल, थकवा, वजन कमी होणे, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, सतत थंडी वाजणे ही टीबीची लक्षणे आहेत. जेव्हा संक्रमित व्यक्ती सतत खोकते, शिंकते किंवा तिच्या बोलण्याच्या माध्यमातूनही क्षयरोग हवेतून पसरतो.

क्षयरोगाची कारणे

धूम्रपानामुळे फुफ्फुसांचे नुकसान होते आणि टीबीची शक्यता वाढते. उपचार न केल्यास, टीबीमुळे फुफ्फुसाच्या ऊतींना कायमचे डाग येऊ शकतात. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याव्यतिरिक्त, व्यक्तीला फुफ्फुसाचा त्रास होऊ शकतो. फुफ्फुस आणि छातीच्या भिंतीमध्ये द्रव जमा होऊ शकतो. ज्यामुळे छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

टीबी मणक्याच्या हाडांनाही संक्रमित करू शकतं, ज्यामुळे पाठदुखी होते आणि पाठीच्या कण्यावर दबाव पडतो. विलंब न करता क्षयरोगाचे ठोस असं निदान करणे ही काळाची गरज आहे जेणेकरून या आजारावर त्वरित उपचार मिळून रुग्ण बरे होऊ शकतात.

क्षयरोगाचे उपचार

क्षयरोगाचे लवकर निदान होणे हा रुग्णांसाठी पुढचा धोका टळण्यासाठी फार महत्त्वाचे असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये खोकला आणि श्वास लागणे यांसारखी लक्षणे दिसली तर त्यांनी ताबडतोब तज्ञाचा सल्ला घेणं गरजेच आहे. टीबीचे निदान करण्यासाठी आणि वेळेवर उपचार सुरू करण्यासाठी एएफबी स्मीअर, जीन एक्सपर्ट चाचणी, टीबी डीएनए पीसीआर, टीबी कल्चर आणि औषध या महत्त्वाच्या चाचण्या आहेत.

टीबीमुळे शरीरावर काय परिणाम होतो?

मॅनटॉक्स ट्यूबरक्युलिन स्किन टेस्ट (टीएसटी) आणि इंटरफेरॉन-गॅमा रिलीझ एसे (आयजीआरए), सीटी स्कॅन, एक्स-रे, थुंकी आणि फुफ्फुसातील द्रव यासाठी रक्त तपासणी करावी लागते. तसेच या आजाराचे त्वरीत निदान होणं गरजेच आहे कारण यामुळे रुग्ण यातून बरे होऊ शकतात. तसेच त्या व्यक्तीपासून इतरांनाही त्या आजाराचा प्रसार होण्याचा धोका कमी होतो.

जसे की एचआयव्ही रूग्णांसाठी लवकर झालेलं निदान जीवन वाचवणारं असू शकतं कारण त्यावरून त्या रुग्णांना योग्य ते उपचार देणे शक्य होतं.क्षयरोगाशी लढा देण्याच्या बाबतीत, अचूक निदान हाच सर्वप्रथम उपाय.

तसेच अजूनही टीबीबद्दल योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेच आहे. कारण बऱ्यापैकी अनेकांना टीबीबद्दल हवी तेवढी जागृकता नाहीये. त्यामुळे बऱ्याचदा या आजाराची लक्षणे लक्षात न आल्यानं याचा गंभीर परिणाम भोगावा लागू शकतो. त्यामुळे या आजाराबद्दल माहिती असणं फार गरजेच आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

करोडोंची गाडी पंतप्रधानांची, माझी तर मारुती 800 आहे! भाजपच्या मंत्र्यानं सांगितला मनमोहन सिंग यांचा साधेपणा करोडोंची गाडी पंतप्रधानांची, माझी तर मारुती 800 आहे! भाजपच्या मंत्र्यानं सांगितला मनमोहन सिंग यांचा साधेपणा
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात 10 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास...
भरकटलेल्या तरुणाची केली सुखरूप घरवापसी, सिक्युर कंपनीच्या स्टाफची कौतुकास्पद कामगिरी
बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर फेकली अंडी
राजगुरूनगरमध्ये दोन चिमुरड्यांची हत्या; एकीवर अत्याचार 54 वर्षीय नराधमाला अटक
‘आंबेडकरी आई’ ग्रंथाचे शनिवारी दादरमध्ये प्रकाशन
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणार ; देश-विदेशातून अनुयायी
नवे सरकार येताच मंत्रालयातील 602 क्रमांकाचे दालन पुन्हा चर्चेत