सेलिब्रिटींची मुलं शिकणाऱ्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी किती? ऐश्वर्या-अभिषेक आराध्यासाठी भरतात इतके लाख

सेलिब्रिटींची मुलं शिकणाऱ्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी किती? ऐश्वर्या-अभिषेक आराध्यासाठी भरतात इतके लाख

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते सेलिब्रिटींची मुलं. कारण या शाळेत जवळपास बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची मुलं शिकतात. पण कधी तुम्हाला हा प्रश्न पडलाय का की सेलिब्रिटींची मुलं शिकणाऱ्या या शाळेची फी नेमकी किती असेल ते.

आजकाल शाळांची फी इतकी वाढली आहे की जे सहजासहजी भरणंही काहींना शक्य नसतं. मुळात जवळपास सर्वच शाळांची फी आता वाढत असल्यानं पालकांना आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी तडजोड करावीच लागते. पण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सेलिब्रिटींच्या मुलांव्यतिरक्तही सामान्य घरातील मूलही शिक्षण घेतात .

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ही देशातील टॉप स्कूलपैकी एक आहे. या शाळेची फी नक्की किती आणि ती परवडणारी आहे का? तसेच सध्या चर्चेत असलेले ऐश्वर्या-अभिषेक आपल्या लेकीसाठी किती फी भरतात ते पाहुया.

प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. प्रवेशासाठी देशभरातील मुले येथे अर्ज करतात. त्यानंतर प्रवेश परिक्षेतील गुणांनुसार मोजक्याच मुलांना प्रवेश मिळतो. प्रवेशप्रक्रियेसाठी बरेच नियम आहेत.

जगातील टॉप 20 आणि भारतातील टॉप 10 शाळांमध्ये धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा नंबर लागतो. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल मुंबई सीआईएससीई, सीएआईई आणि आईबी या बोर्डने एफिलेटेड असून या तीन बोर्डमधून तुम्ही तुमच्या मुलांचे अॅडमिशन करु शकता. मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी येथे अभ्यासासोबतच अनेक उपक्रम राबवले जातात.

कशी असते प्रवेश प्रक्रिया

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेशासाठी तुम्हाला स्कूलच्या अधिकृत साईटवर भेट देवून ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. त्यानंतर तुम्हाला एक मेल येतो. त्यामध्ये आवश्यक ती कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फॉर्म फी 8000 रुपये ऑनालाईन भरुन सबमिट करावा लागतो. यानंतर प्रवश परिक्षा आयोजित केली जाते. परिक्षेतील उतीर्ण विद्यार्थ्यांची मुलाखतीद्वारे निवड होते. जन्मतारीख, मुलाखत, प्रवेश प्रक्रियेतील गुण याद्वारे स्कूलमध्ये प्रवेश दिला जातो.

 

View this post on Instagram

 

A post shared by @aish__a31


फी किती?

तुम्ही कोणत्या बोर्डामार्फत प्रवेश घेता आणि तुम्ही ज्या वर्गात प्रवेश घेतला आहे त्यानुसार तुम्हाला फी द्यावी लागते. स्कूलमध्ये फी स्ट्रक्चर हे इयत्तेनुसार वेगवेगळे आहे. एलकेजी ते इयत्ता 7 वी पर्यंतची फी 1 लाख 70 हजार रुपये आहे. इयत्ता 8 वी ते 10वी साठी वार्षिक फी 5 ते 6 लाखांपर्यंत वाढते.

8वी ते 10वी इयत्तेच्या IGCSE साठी वार्षिक फी 5.9 लाख रुपये असल्याचं म्हटलं जातं. तर, IBDP बोर्डाची 11वी आणि 12 वीची वार्षिक फी 9.65 लाख रुपये असेल. फी बाबत जाणून घेण्यासाठी तुम्हाला धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनाशी संपर्क करावा लागेल. या फीमध्ये बदलही असू शकतात.

शाळेत काय सुविधा दिल्या जातात.

या स्कूलमध्ये अनेक क्रीडा प्रकार व सुविधा उपलब्ध आहेत. मुले त्यांच्या आवडीनुसार क्रिडा प्रकारात प्रवेश घेऊ शकतात. धनुर्विद्यापासून हँडबॉलपर्यंत, शूटिंगपासून योगापर्यंत कोणताही खेळ विद्यार्थी खेळू शकता.

शैक्षणिक सुविधांबद्दल बोलायचं तर शाळेत ग्रंथालय, डिजिटल लायब्ररी, समुपदेशन केंद्र, परीक्षा केंद्र, स्टुडंट एक्सेंज असे अनेक प्रकार येथे उपलब्ध आहेत. आधुनिक क्लासरुमपासून वाहतूक सुविधांपर्यंत सर्व काही येथे उपलब्ध आहे.

ऐश्वर्या-अभिषेक आराध्यासाठी किती फी भरतात

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लाडकी मुलगी आराध्या बच्चन मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. आराध्या बच्चन या शाळेत नर्सरीपासून शिकत आहे. आता ती इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेतेय.

त्यामुळे तिची फी लाखोंच्या घरात जाते. आराध्याच्या फीबद्दल बोलायचे झाले तर अनेक मीडिया रिपोर्टनुसार ऐश्वर्या आणि अभिषेक त्यांच्या मुलीसाठी महिन्याला 4.5 लाख फी भरतात असं म्हटलं जातं. दरम्यान आराध्याशिवाय शाहरुख खान, करीना कपूर, शाहिद कपूर आणि रितेश देशमुख यांसारख्या अनेक स्टार्सची मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by @aish__a31

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, दिल्लीनंतर आता मुंबई, ठाण्यात बांगलादेशींवर धडक कारवाई महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, दिल्लीनंतर आता मुंबई, ठाण्यात बांगलादेशींवर धडक कारवाई
Mumbai Crime News: दिल्लीत बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत 175 संशयित बांगलादेशींना...
‘फक्त कपड्याचा रंग निळा असला म्हणजे…’, परभणी दौऱ्यावरून नारायण राणेंचा राहुल गांधींना सणसणीत टोला
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लॉटरी, राज्य सरकारनंतर आता केंद्राकडूनही मोठं गिफ्ट
अनंत अंबानी यांच्यावर बॉलीवूड सिंगर मिका सिंग नाराज? सांगितले लग्नात परफॉर्मसाठी किती मिळाले पैसे
‘हा’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे तब्बल 11 बिअर ब्रँडचा मालक; भारतातील तिसरा सर्वात मोठा बिअर ब्रँड
कोरोनापेक्षाही महाभयंकर आजार… सतत थरथर कापतात लोक, महिला आणि लहान मुलांना सर्वाधिक धोका; देशच हादरला
रताळे कोणत्या आजारांवर रामबाण उपाय पाहा ? काय आहेत फायदे?