बॅगवरील टीकेला बॅगनेच प्रत्युत्तर; प्रियांका गांधींचा भाजपवर जोरदार पलटवार
वायनाडमधून खासदार म्हणून निवडून आलेल्या खासदार प्रियांका गांधी आता संसदेत भाजपविरोधात चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. प्रियांका गांधी यांनी सोमवारी ‘पॅलेस्टाईन’ शब्द असलेल्या हॅडबॅगने संसदेत आणली होती. त्यावर सत्ताधीर भाजपने एका समुदायाच्या तुष्टीकरणासाठी हे प्रयत्न असल्याचा आरोप त्यांच्यावर केला होती. आता या बॅगेवरील टीकेला प्रियांका गांधी यांनी बॅगनेच प्रत्युत्तर दिले आहे.
मंगळवारी त्यांनी बांग्लादेश हिंदू और इसाईयोंके साथ खडे रहो, असा संदेश असलेली बॅग आणली. या त्यांच्या कृतीने त्यांनी सत्ताधारी भाजपवर जबरदस्त पलटवार केला आहे. या बॅगद्वारे त्यांनी बांगलादेशात हिंदू, ख्रिश्चन आणि अल्पसंख्याक समुदायावर होणाऱ्या हल्ल्यांकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या कृतीने प्रेरीत होत संसदेतील विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनीही अशीच बॅग हातात घेत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.
आज संसद के शून्य काल में अपनी बात रखी-
बांग्लादेश में हिंदुओं और ईसाई अल्पसंख्यकों पर हो जो अत्याचार हो रहा है, उसके खिलाफ सरकार को ठोस कदम उठाने चाहिए।
दुख की बात है कि सेना के हेडक्वार्टर में से वह तस्वीर हटा दी गई है जिसमें पाकिस्तान की सेना भारतीय सेना के सामने आत्मसमर्पण… pic.twitter.com/BVTeniU289
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 16, 2024
या बॅगद्वारे काँग्रेस खासदार प्रियंका गांधी-वाड्रा यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या दुर्दशेकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. बांगलादेशी हिंदू आणि ख्रिश्चनांच्या पाठीशी उभे राहा, असा संदेश त्यांच्या बॅगेवर आहे. लोकसभेत सोमवारी शून्य प्रहरादरम्यान आपल्या भाषणात प्रियंका गांधी यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला. तेथील हिंदू आणि ख्रिश्चनांच्या सुरक्षेसाठी केंद्राने बांगलादेशशी संपर्क साधत शांततेसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारने बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. आपण बांगलादेश सरकारशी यावर चर्चा केली पाहिजे आणि पीडित अल्पसंख्याक समुदायांना पाठिंबा दिला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. सोमवारी पॅलेस्टाईनच्या बॅगेवरून टीका झाल्यानंतर त्यांनी या टीकेला बॅगेद्वारेच जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे. सरकारने बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांबाबत ठोस भूमिका घ्यावी. बांगलादेश सरकारशी याबाबत बोलाने फक्त वाचाळपणा करू नये, असेही त्यांनी सरकारला सुनावले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List